इलेक्ट्रिकल अभियंता तरुणाचा गृहोपयोगी प्रकल्प : ‘वन टाईम‘ पूश ; वॉटर टँक भरण्याच्या कटकटीतून मुक्ती

0
12
इलेक्ट्रिकल अभियंता तरुणाचा गृहोपयोगी प्रकल्प

◼️वन टाईम‘ पूश ; वॉटर टँक भरण्याच्या कटकटीतून मुक्ती

चंद्रपूर : गरज ही आविष्काराची जननी असते, असे म्हटले जाते. एका खासगी कंपनीत इलेक्ट्रिकल अभियंता म्हणून नोकरीवर असणाèया एका तरुणाने आपल्या कल्पकतेतून दैनंदिन जीवनात सर्वांच्याच उपयोगी पडेल असा गरजेचा प्रकल्प तयार केला आहे. एकापेक्षा अनेक पाण्याच्या टाक्या असणाèया लोकांना टाकी भरण्यासाठी अनेकदा त्रास व कटकट सहन करावी लागते. या त्रासातून मुक्ती देण्यासाठी हा छोटेखानी प्रकल्प निश्चितच उपयुक्त ठरेल यात शंका नाही.
निखिल बळवंत बनकर हा विठ्ठल मंदिर वॉर्डात राहतो. तो एका खासगी कंपनीत इलेक्ट्रिकल अभियंता म्हणून नोकरीवर आहे. परंतु, फक्त नोकरी करून समाधान मानणार्यांपैकी तो नाही. विविध नावीन्यपूर्ण प्रयोग करून त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा वापर करता येईल, याकडे त्याचा कल असतो. कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने त्यालाही कंपनीच्या कामातून बराच फावला वेळ मिळाला. हा वेळ सत्कारणी लावण्यासाठी तो काही तरी प्रयोग करण्याच्या शोधात होता. याच कालावधीत निखिल हा मूल येथे आपल्या आत्या कमलताई निंबाळकर यांच्याकडे गेला. श्रीमती निंबाळकर यांच्याकडे चार भाडेकरू आहेत. प्रत्येक भाडेकरुंसाठी स्वतंत्र पाण्याची टाकी आहे. टाकीमधील पाणी संपल्यास टाकी भरण्यासाठी खूप डोकेदुखी करावी लागते. मोटारपंपाला लावलेल्या एका वायरचे प्लग वेगवेगळ्या बोर्डवर लावणे, वर जाऊन व्हॉल्व्ह फिरविणे अशा कटकटीचा व त्रासाचा सामना करावा लागतो. बर्यायाचदा टाकी भरून पाणी वाया जाते अशी समस्या त्यांनी सांगितली. निखिल हा इलेक्ट्रिकल इंजिनिअर असल्याने याबाबत काहीतरी उपाययोजना करण्याची विनंती केली. जुगाडू असलेल्या निखिलने आपल्या कल्पनाशक्तीचा व तंत्रज्ञानाचा अत्यंत खुबीने वापर करून त्यावर या प्रकल्पाची मात्रा शोधून काढत त्यांना दिलासा दिला.
🔷 श्रमआणि वेळेची बचत…
एकापेक्षा अधिक भाडेकरू असणार्या व्यक्तींना तसेच बहुमजली इमारतीत वास्तव्य असणार्या व्यक्तींसाठी हा प्रकल्प कमालीचा उपयुक्त ठरणारा आहे. बहुतांश घरात बोअरवेल व मोटारपंपाची संख्या एकच असते. परंतु, पाणीवापर व वीजबिलाच्या वादामुळे प्रत्येकासाठी स्वतंत्र पाणी टाकीची सोय करावी लागते. अशावेळी पाण्याची टाकी भरण्यासाठी प्रत्येकाला वायर देणे, टाकीचे व्हॉल्व्ह त्याच्या टाकीत फिरविणे अशी कसरत घरमालकाला करावी लागते. यात आजारी व वृद्ध व्यक्तींना सर्वाधिक त्रास होतो. परंतु, या प्रकल्पाद्वारे प्रत्येक जणाला आपल्या घरातील मीटरवरुनच ही सर्व यंत्रणा हाताळता येणे शक्य होणार आहे. मोटार सुरू झाली, टाकी भरली याबाबतचे संकेत त्याला या यंत्रणेद्वारे मिळतात. तसेच जर टाकी भरलेली असल्यास मोटारपंप सुरूच होत नाही. यात श्रम, वेळ व पर्यायाने विजेचीसुद्धा बचत होणार आहे.
🔷 असा आहे प्रकल्प…
‘वन टाईम‘ पूश‘ असे या प्रकल्पाचे नाव आहे. एकवेळा कळ दाबली की यंत्रणा कार्यान्वित होते. पाण्याची इलेक्ट्रिक मोटार सुरू होऊन टाकी भरल्यानंतर आपोआपच बंद होईल. यासुविधेमुळे वायर प्लग प्रत्येकाकडे देण्याची गरज नाही. पाणी टाकीचा व्हॉल्व्ह चालू-बंद करण्याची गरज राहणार नाही. प्रत्येकाच्या वीज मिटरवरुन आपली टाकी भरता येईल.
◼️(प्रतिक्रिया)
या प्रकल्पाला सुविधेच्या तुलनेत येणारा खर्च कमी आहे. स्वस्त आणि सहज हाताळता येणारे हे तंत्रज्ञान अनेकांना उपयुक्त ठरणारे आहे. कमी किंमतीत हा प्रकल्प लोकांपर्यत पोहोचविण्याचा आपला प्रयास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या लोकांना स्वदेशी तंत्रज्ञानातून स्वावलंबी व आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले आहे. त्याच दृष्टीने आला हा छोटासा प्रयत्न आहे.
निखिल बनकर,विठ्ठल मंदिर वॉर्ड,चंद्रपूर, मो. क्र. ९९२३७६९६९८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here