पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार आजपासून चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

0
43
पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार आजपासून चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर, दि. 30 सप्टेंबर : महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार दिनांक 1 ऑक्टोंबर गुरुवार ते 3 ऑक्टोंबर शनिवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

1 ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. दुपारी 2 वाजता शासकीय विश्राम गृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव असणार आहेत. दुपारी 2.10 वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, फ्रँटल ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे चर्चा करणार आहेत. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. तसेच त्यानंतर दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोरोना बाबत आढावा बैठक घेणार आहेत. बैठक संपल्यानंतर हिराई विश्रामगृह, ऊर्जा नगर, चंद्रपूर येथे मुक्काम असणार आहे.

शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोंबर सकाळी 9:30 वाजता महात्मा गांधी जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. सकाळी 11:00 वाजता आयोजित धरणे आंदोलन कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1:00 वाजता चंद्रपूर वरून सिंदेवाही कडे प्रयाण करतील. दुपारी 2:15 वाजता सिंदेवाही येथे आगमन व कोविंड-19 बाबत देवयानी इंटरनॅशनल स्कूल सिंदेवाही येथे आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी 3:00 वाजता देवयानी इंटरनॅशनल स्कूल सिंदेवाही येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. सायंकाळी 4:00 वाजता सिंदेवाही वरून सावलीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 4:30 वाजता गोसेखुर्द विश्रामगृह सावली येथे आगमन व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. सायंकाळी 6:00 वाजता सावलीवरून गडचिरोलीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6:30 वाजता शासकीय विश्रामगृह, रानफुल निवास गडचिरोली येथे आगमन व मुक्काम करतील.

शनिवार दिनांक 3 ऑक्टोंबर सकाळी 10:30 वाजता गडचिरोली वरून ब्रह्मपुरीकडे प्रयाण करतील. दुपारी 12:00 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे आगमन व कोविंड-19 बाबत आढावा बैठक घेतील. दुपारी 1:00 वाजता गोसेखुर्द मुख्य उजवा कालव्यातून कोकलापार तलाव मौजा निमगाव तालुका सावली मध्ये सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेणार आहेत. सायंकाळी 4:00 वाजता ब्रह्मपुरी वरून नागपूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6:00 वाजता कमलाई निवास, रामदास पेठ, नागपूर येथे आगमन व मुक्काम राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here