वीज पडून दोघे ठार तर दोघे जखमी २ गंभीर तर १६ किरकोळ जखमी 

0
5
वीज पडून दोघे ठार तर दोघे जखमी
२ गंभीर तर १६ किरकोळ जखमी 
चंद्रपूर ( १४ जुलै ) : तळोधी(बा.) पोलीस स्टेशन अंतर्गत तळोधी-मुल रोड वर नवोदय विध्यालय फाट्यावर वडाच्या झाडाच्या खाली पावसात लोक उभे होते, त्यापैकी विज पडुन दोघांचे मृत्यू झाले. ही घटना काल सायंकाळी ३:३०ते ४ वाजता घडली.
 
नाग भिड तहसील अंतर्गत येणाऱ्या तळोधी (बा) ते सिंदेवाही मार्गावरील कोजबी फाटा येथे पाऊस येऊ लागल्याने काही व्यक्ती चहा बंद टपरीवर थांबले होते. अचानक पाऊस, व विजेचा कड काडक आवाज येताच झाडाखाली विश्रांती घेत असलेले अशोक कवडूजी तिरमारे वय ४५ रा. वल नी, लोकचंड रामू पोहनकर वय १२ हे जागीच ठार झाले तर दोघे जखमी झाले या घटनेत २ गंभीर तर १६ किरकोळ जखमी झाले.
 नागभीड तालुक्यातील मांगरुड येथिल लता दत्तुजी चिलबुले, रागीना संजय जिवतोडे या दोन महिलांचा समावेश आहे.
नागभिड तालुक्यातील तळोधी येथील वलनी जवळील नवोदय वळणावर परिसरात विज पडून २ ठार , २ गंभीर, १७ किरकोळ जखमी झालेत.
अचानक पाऊस येत असल्याने झाडाखाली विश्रांती घेत असताना झालेल्या प्रसंगाने त्या कुटुंबावर संकट आले आहेत यामुळे सर्व परिसरात दुखाचे सावट पसरले असून घटना घडल्या ठिकाणी पोलीस  दाखल करून पुढील तपास ठाणेदार करीत आहे.◼️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here