दहावी व बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच !

0
52
आठवी, नववीबाबत लवकरच निर्णय-वर्षा गायकवाड यांची माहिती !

मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंबंधी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळेत आणि ऑफलाइन होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले असून त्यानुसार दहावीची बोर्ड परीक्षा २९ एप्रिल ते २0 दरम्यान होणार आहे. तर, बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे. आम्ही खूप सार्‍या तज्ञांशी यासंबंधी बोलत आहोत. सध्या तरी परीक्षेची जी तारीख दिली आहे त्या वेळापत्रकानुसारच परीक्षा होणार आणि ऑफलाइन पद्धतीने होणार कारण ही बोर्डाची परीक्षा आहे.

पुढील अभ्यासक्रमासाठी या मुलांचा पाया मजबूत होणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे या मुलांचे शिक्षण सुरू राहू दे. सध्या ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. अनेक जिल्हय़ांमध्ये जिथे रुग्ण वाढले आहेत तिथे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पण जर नववीचा विद्यार्थी शेवटपर्यंत शिकला नाही तर दहावीसाठी कसा तयार होईल? किंवा अकरावीचा विद्यार्थी शिकला नाही तर बारावीची बोर्डाची परीक्षा कसा देईल? त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन, ऑफलाइन माध्यमातून सुरू राहावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परीक्षेसंबंधी लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here