टेलिफोनिक कॉन्सिलिंगसाठी डायल करा 155-398 !

0
125
हॅलो चांदा देणार मानसिक आधार !
जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन !

चंद्रपूर, दि.1 ऑगस्ट :कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मानसिक समस्येचे उत्तर शोधण्यासाठी अर्थात नागरिकांना मानसिक आधार देण्यासाठी आत्मभान अभियानांतर्गत टेलिफोनिक कॉन्सिलिंग सुरू झाली आहे. ही टेलिफोनिक कॉन्सिलिंग हॅलो चांदा 155- 398 या हेल्पलाईन क्रमांकावर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मानसिक समस्येचे निराकरण करण्यासाठी अर्थात मानसिक आधारासाठी हॅलो चांदाचा उपयोग करण्याचे, आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यामधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हॅलो चांदा ही हेल्पलाईन सुरु केली. हॅलो चांदा हेल्पलाईनला नागरिकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. याद्वारे नागरिक आपली तक्रार सादर करून त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येते.

नागरिकांना मानसिक दडपण येऊ नये, ताणतणावाचे नियोजन याविषयीची माहिती, समस्यांचे निराकरण, नागरिकांना मानसिक आधार देण्यासाठी आत्मभान अभियानांतर्गत टेलिफोनिक कॉन्सिलिंग सुरू झाली आहे. हॅलो चांदा 155-398 ‌या हेल्पलाइन क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत संपर्क साधून मानसिक आरोग्य संदर्भातील अडचणी दूर करता येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात जनजागृती विषयक आत्मभान अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गतच नागरिकांमध्ये असणारे मानसिक आरोग्य विषयीची समस्या, त्यांच्यामध्ये असणारी चिंता सोडविण्यासाठी मानसिक आरोग्य विषयीची हेल्पलाईन अर्थात टेलिफोनिक कॉन्सिलिंग सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासन आणि सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क यांच्यामध्ये टेलिफोनिक कॉन्सिलिंग संदर्भात परस्पर सामंजस्य करार झालेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासोबत सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्कचे प्राचार्य डॉ.सुनिल साकुरे, प्राध्यापिका डॉ.जयश्री कापसे, प्राध्यापक डॉ.देवेंद्र बोरकुटे यांची प्रशिक्षित समुपदेशकांची चमू टेलिफोनिक कॉन्सिलिंगमध्ये काम बघणार आहे. सोबत मनःचिकित्सक डॉ.किरण देशपांडे, समुपदेशक मुग्धा कानगे यांचे सहकार्य राहणार आहे.

नागरिकांमधील असणारी मानसिक समस्येचे निराकरण करण्यासाठी टेलिफोनिक कॉन्सिलिंग महत्वाची भूमिका बजावणार आहे. या टेलिफोनिक कॉन्सिलिंग करण्यासाठी प्रशिक्षित समुपदेशकांची चमू तयार करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी हॅलो चांदा 155-398 ‌ या हेल्पलाईन क्रमांकावर निसंकोचपणे आपल्या समस्या मांडा व समस्येचे निराकरण करण्याचे, आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here