आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मुल शहरात 9 कोटी 27 लक्ष 32 हजार 538 रु किंमतीची विकासकामे मंजुर

0
23

चंद्रपूर :  माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मुल नगर परिषदेला स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 अंतर्गत प्राप्त प्रोत्साहनपर पारितोषिकाच्या निधीतून विकासकामांसाठी 9 कोटी 27 लक्ष 32 हजार 538 रु किंमतीच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दि. 6 जुलै रोजी याबाबत आदेश निर्गमित केला आहे.

स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 अंतर्गत मुल नगर परिषद तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली . या पारितोषिकासाठी रु 10 कोटी प्रोत्साहनपर निधी सदर नगर परिषदेला प्रदान करण्यात आला आहे . या निधीच्या माध्यमातून शहरातील विहिरगाव , वरढी बोडी येथील तलावाचे सौंदर्यीकरण करणे  , शहरात फाऊंटन बांधकाम व विद्युतीकरण करणे, विविध कलाकृती पुतळे उभारणे व सौंदर्यीकरण करणे , शहरात वॉल पेंटिंग करणे , ओडी परिसराचे सौंदर्यीकरण करणे , सिव्हर सक्शन कम जेटिंग मशीन खरेदी करणे , लोडर कम लेव्हलर मशीन खरेदी करणे , व्हॅक्युम एमटीयर मशीन खरेदी करणे ही कामे प्रस्तावित करण्यात आली होती.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयाचा प्रभावी पाठपुरावा करत त्यात यश प्राप्त केले आहे.पारितोषिकाच्या या निधीतून 9 कोटी 27 लक्ष 32 हजार 538 रु किंमतीच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे मुल शहराच्या सौंदर्यात आणखी भर घातली जाणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here