राज्यात जुलैमध्ये 4 लाख 88 हजार 622 शिवभोजन थाळ्यांचे वाटप

0
9

   – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

         मुंबई दि. 6.  राज्यात दि. 1 जुलै ते दि . 5 जुलै पर्यंत 855 शिवभोजन केंद्रातून पाच  रूपये प्रति थाळी याप्रमाणे 4 लाख 88 हजार 622 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यातआले असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

    राज्यात  गरीब व गरजूंना  एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात   30 लाख 96 हजार 232, जुलै मध्ये आतापर्यंत 4 लाख 88 हजार 622 आणि असे एकूण  दि.1 एप्रिल  ते  दि.5 जुलै या कालावधीत 94 लाख 68 हजार 151 शिवभोजन थाळ्या वाटप केल्या  आहेत.

      कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर  राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतलेला होता. हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आलेला होता. मात्र अजूनही नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा  सवलतीचा पाच रुपये दर सप्टेंबर पर्यंत  लागू राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here