निवृत्तीवेतनधारकांना आयकर कपातीत नविन नियम लागू

0
6

निवृत्तीवेतनधारकांना आयकर कपातीत नविन नियम लागू

चंद्रपूर, दि. 25 ऑगस्ट : वर्ष 2020-21 मध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आयकर कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आयकर विभागाच्या नविन नियम सेक्शन 115 बीएसी नुसार या आर्थिक वर्षांत नविन नियमानुसार आयकर कपातीत सुधारणा करण्यात आल्या आहे. नविन नियमानुसार आयकर कपात करावयाची असल्यास 30 सप्टेंबर पुर्वी कोषागार अधिकारी कार्यालयास कळविण्यात यावे, अन्यथा आपली कपात जुन्या नियमानुसार होणार आहे, अशी माहिती एका प्रसिध्दीपत्रकात जिल्हा कोषागार अधिकारी श्री. पेंदाम यांनी केले आहे.

2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना पुर्वीप्रमाणे आयकर कपात होणार नाही. 2.5 ते 5 लाख या मधील उत्पन्न असणाऱ्यांना सुद्धा पुर्वीप्रमाणे आयकर कपात 5 टक्के होणार आहे. 5 लाख ते 7.5 लाख उत्पन्न ज्यांचे आहे, त्यांना पुर्वी 20 टक्के कपात होणार होती, नविन नियमानुसार त्यांची 10 टक्के कपात होणार आहे. 7.5 ते 10 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना पुर्वी 20 टक्के आयकर कपात होती, ती नविन नियमानुसार 15 टक्क्यावर आली आहे. 10 लाख ते 12.5 लाख पर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना पुर्वी 30 टक्के कपात होती, ती आता नविन नियमानुसार 20 टक्के होणार आहे. 12.5 लाख ते 15 लाखांपर्यंत ज्यांचे उत्पन्न आहे, त्यांना पुर्वी 30 टक्के आयकर कपात होती, ती नविन नियमानुसार 25 टक्के होणार आहे. 15 लाखांवरील उत्पन्न असणाऱ्यांना पुर्वी प्रमाणे 30 टक्के आयकर कपात होणार आहे.

पुर्वी 50 हजाराचा मानक वजावटाचा जो लाभ मिळत होता, तो आता नविन नियमानुसार मिळणार नाही. तसेच 80 सी, 80डी, 80 सीसीडी, 80 जी, यासारख्या गुंतवणुकीतून जो आयकर कपातीत लाभ मिळत होता तो फक्त 80 सीसीडी (एनपीएस) गुंतवणूकीवर नविन नियमानुसार मिळणार आहे.

ज्यांना नविन नियमाचा लाभ घ्यावयाचा आहे. त्यांनी आवश्यक असल्यास आपल्या नजीकच्या सनदी लेखापालाची मदत घेऊन आपण निवडलेला पर्यांय कोषागार कार्यालयाच्या to.chandrapur@zillamahakosh.in या ई-मेल खात्यावर आपले नाव, पीपीओ क्रमांक, खाते असणाऱ्या बॅकेचे नाव व शाखेच्या नावासोबत दिनांक 30 सप्टेंबर 2020 पुर्वी कळविण्यात यावे. जणे करून आपण निवडलेल्या पर्यायानुसार टीडीएस वजाती करता येईल. ज्यांनी पर्याय दिलेल्या तारखेपर्यंत निवडला नाही, त्यांची पुर्वीप्रमाणे टीडीएस वजाती करण्यात येणार आहे.◼️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here