शक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर  !

0
52
चंद्रपूर :  आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात दिशा कायदा अमलात आणावा, यासाठी आमदार प्रतिभाताई धानोरकर नेहमी आग्रही होत्या. सर्वप्रथम नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनीच ही मागणी केली होती. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता आणि आज ‘दिशा’च्या धर्तीवर महिलांसाठी शक्ती हा कायदा आकार घेतो आहे. याची दखल घेत शक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना घेण्यात यावे अशी शिफारस विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेता बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना केली आहे.
  वरोरा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धोनोरकर यांनी सातत्याने हा प्रश्न विधिमंडळात लावून धरला होता. आंध्रप्रदेश च्या धर्तीवर हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात यावा यासाठी सर्वप्रथम मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनीच केली होती. त्यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा कायदा समजून घेण्यासाठी आंध्रप्रदेश चा दौरा केला होता. त्यानुसार आता महाराष्ट्रातही हा कायदा लागू होणार आहे, त्यामुळे सर्व स्तरातून आमदार प्रतिभा धानोरकर यांचं कौतुक आणि अभिनंदन होत आहे. अल्पावधीत च आमदार धोनोरकर यांनी महिलांचे अनेक प्रश्न विधिमंडळात लावून धरल्याने महिलांच्या प्रश्नासंबंधी जागरूक आमदार म्हणून त्यांची लोकप्रियता वाढत आहे.
  महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्यशासनाने, शक्ती हा नवीन कायदा निर्माण केला असून त्यामुळे निर्भयासारखा गुन्हा राज्यात घडल्यास एक महिन्याच्या आत शिक्षा होणार आहे, याशिवाय समाजमाध्यमावर महिलांची बदनामी करणे, ऍसिड हल्ला, विनयभंग यासारखे गुन्हे  हे सारे खटले काही दिवसातच निकाली काढण्यात येणार असून या साठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र तपास यंत्रणा व स्वतंत्र न्यायालये स्थापन करण्यात येणार आहे. हा कायदा अतिशय महत्वाचा असून आंध्रप्रदेश च्या धर्तीवर हा कायदा तयार करण्यात आला आहे. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या कामाची दखल घेत त्यांना शक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर घेतल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here