विदर्भातील शासकीय कंत्राटदारांची सुमारे एक हजार कोटींची बिले थकीत !

0
56

शासकीय बांधकाम कंत्राटदार आर्थिक विवंचनेत !

चंद्रपूर : विदर्भामध्ये जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांची बिले थकित असून विदर्भात सुमारे दहा हजार शासकीय कंत्राटदार आहेत. एक हजार कोटीच्या जवळपास बिले कोरोनाच्या संकटामुळे रखडलेली आहेत. बांधकाम व्यवसायामध्ये जवळपास सर्वच घटकांचा समावेश होत होत असल्यामुळे अनेक कुटुंब या व्यवसायावर आपला आर्थिक गाडा ढकलीत असतात. शासकीय कंत्राटदारांची बिले थकीत शासकीय बांधकाम कंत्राटदार आर्थिक विवंचनेत असल्यामुळे या व्यवसायाशी संबंधित कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाचा निधी रोखून धरला. शिवाय कंत्राटदारांची बिलेही काढली नसल्यामुळे शासकीय कंत्राटदार मध्ये अवस्थता पसरली आहे. कामगारांची देणी आणि खर्च कसा भागवायचा, अशा चिंतेत विदर्भातील शासकीय कंत्राटदार आहे.

विदर्भात सुमारे २० हजारांच्या घरात कंत्राटदार आहेत. २०२० वर्षातील सार्वजनिक बांधकाम विभागातील बिले शासनाने अद्यापही अदा केलेले नाही. कोरोनाच्या संकटात बिले निघाली नाही. ही बाब मान्य करण्यासारखी आहे. परंतु, सद्य स्थितीत राज्यातील बहुतांश व्यवहार सुरु झालेले आहे. शासनालाही महसूल प्राप्त होणे सुरु झाले आहे. तेव्हा राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागातील शासकीय कंत्राटदारांनी केलेल्या बांधकामांची बिले टप्प्याने टप्प्याने का होईना काढून देणे शक्य आहे. जून महिन्यात शासनाने काही प्रमाणात सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र याची अद्यापही अंमलबजावणी नाही.
कंत्राटदारांची बिलेच निघत नसल्याने आर्थिक अडचणींचा तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक कंत्राटदारांकडे आस्थापना आहे. या आस्थापनेवर किमान १० जण काम करतात, शिवाय मजूरवर्गही आहेच. हा खर्च कुठून भागवायचा, सध्या शासकीय कंत्राटदारांना सतावत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्य शासनाकडे विदर्भ कंत्राटदार संघटनेने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here