रस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी

0
34
आ. रोहित पवारांनी मानले गडकरींचे आभार !
महाराष्ट्राला व्हेंटिलेटर्सची गरज लक्षात घेता आंध्रप्रदेश सरकारकडून ३00 व्हेंटिलेटर्स महाराष्ट्राला मिळवून दिल्याबद्दल आ. रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे. तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी व्हेंटिलेटर्स पुरवठा करण्याबाबतचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचेही आ. रोहित पवार यांनी आभार मानले.

नागपूर : स्टील आणि सिमेंटचे भाव आता बांधकामासाठी न परवडणारे असून या मालाच्या उत्पादकांच्या वागणुकीबद्दल चिंता व्यक्त करीत केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते बांधकामात स्टील आणि सिमेंटचा वापर कमी करण्यावर भर दिला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून स्टील आणि सिमेंटसाठी पर्याय शोधण्याचे काम आम्ही करीत असून त्यासाठी एका समितीचे गठनही करण्यात आल्याचे ना. गडकरी यांनी सांगितले.
असोचेमच्या वेबिनारमध्ये एचएएम आणि बीओटी प्रकल्प संधी व आव्हाने, या विषयावर ना. गडकरी बोलत होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले- दररोज ३७ किमी महामार्ग बांधकामाची गती, एका दिवसात चौपदरी २.५ किमी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम आणि एका दिवसात २६ किमी डांबरी रस्त्याचे बांधकाम हे तीन जागतिक विक्रम आमच्या मंत्रालयाने केले आहेत. हे जागतिक विक्रम भारतीय कंत्राटदारांची क्षमता काय आहे, हे दाखविणारे आहेत. देशासाठी हे भूषणावह आहे. असे असले तरी बीओटी प्रकल्पांना शासनाच्या अपेक्षेप्रमाणे फारसा प्रतिसाद मिळत नाही. तसेच बँकेचे आर्थिक वर्ष समाप्ती आणि बँक गॅरंटी याबद्दलच्या अडचणी कंत्राटदारांना भेडसावत आहेत. यावरही अर्थ मंत्रालयाशी चर्चा करून मार्ग काढण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले.
महामार्ग मंत्रालयाचे काम अत्यंत उत्तम सुरु असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले, मंत्रालयाने १३,३२७ किमी महामागार्चे निर्माण वर्षभरात केले असून २0२0 च्या तुलनेत हे अधिक आहे. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत महामार्गाच्या कामांना मंजुरी देण्याचे प्रमाणही अधिक आहे. मार्च २१ पयर्ंत १0९५६ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सिमेंट व स्टीलऐवजी अन्य धातूचा किंवा स्क्रॅप वितळवून त्याचा महामार्गाच्या बांधकामात उपयोग करता येऊ शकतो काय, हे तपासण्याचे निर्देश आपण दिले आहेत. स्टीलशिवाय वापरण्यात येणारे हे साहित्य एनएबीएल प्रमाणित प्रयोगशाळेकडून तपासून घेतले जाणार आहे आणि बांधकामाच्या दर्जात कोणताही समझोता न करता याचा वापर केल्या जाणार असल्याचेही ते म्हणाले. पुलांचे बांधकाम करताना एक्सपान्शन जॉईंटचे काम योग्य पध्दतीने केले जात नसल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- महामागार्चे बांधकामही ठरलेल्या निकषानुसार केल्या जात नाही. भारतमाला परियोजनेचा दुसरा टप्पा आपण सादर केला असून ३५ ते ४0 हजार किमीचे बांधकाम या योजनेअंतर्गत होणार आहे. कंत्राटदार वृक्षारोपण करीत नाही अशा अनेक तक्रारी आहेत. २0 फुटाचे झाड लावण्याच्या आपल्या सूचना आहेत. तसेच हरित महामार्ग निर्माण करायचे असल्यामुळे कंत्राटदारांनी वृक्षारोपणाची सूचना गांभीर्याने लक्षात घ्यावी. तसेच कंत्राटदारांनी बांधकामासाठी वापरण्यात येणार्‍या वाहनांमध्ये डिझेलचा वापर न करता सीएनजी, एलएनजीचा वापर करावा. यामुळे खर्चात बचत होईल. हरित इंधनासाठीही पुढाकार घ्यावा असेही ना. गडकरी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here