येरगाव ग्रामपंचायत च्या भ्रष्टाचारात सत्ताधाऱ्यांना BDO चे पाठबळ !

0
259

 

नागरिकांच्या तक्रारीकडे BDO कलोडे यांचा कानाडोळा !

मुल तालुक्यातील प्रकरण, निष्पक्ष चौकशीची येरगाव च्या नागरिकांची मागणी !

मुल तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय येरगाव येथील गलथान कारभाराची चौकशी करून योग्य तो न्याय मिळवा यासाठी येरगाव वासियांनी वारंवार निवेदन व संबंधित अधिकाऱ्यांशी भेटी घेऊन तक्रारी केल्या परंतु अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला, मुल चे BDO कलोडे यांचे येरगांव ग्रामपंचायत च्या सत्ताधाऱ्यांना पाठबळ तर नाही नां? अशी चर्चा येरगांव चे नागरिक करिता आहे. नुकतेच त्यांनी BDO कलोडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केल्यानंतर या प्रकरणाचे निवेदन सादर केले आहे. प्राप्त माहितीनुसार 400 च्या जवळपास लोकांनी या निवेदनावर आपले हस्ताक्षर केले आहे.

सविस्तर वृत्त असे की, सादर केलेल्या निवेदनामध्ये ग्रामपंचायत येरगाव येथील शिपाई यांनी किरकोळ सामानाची चोरी करून प्रकरण उघडकीस न आणता अफरातफर केली आहे. ही माहिती गावकऱ्यांना कळताच त्यांनी म्बि.डी.ओ. साहेबांना देऊन योग्य तो न्याय मिळण्याबाबत निवेदन दिले तसेच पाणी पूरवठा विशेष निधी अंतर्गत नविन पिण्याच्या पाईपलाइन मध्ये घोळ, ग्रामपंचायत च्या ठरावा प्रमाणे काम झाले नाही ज्या ठिकाणी ४ इंच पाइपलाइन पाहिजे होती त्या ठिकाणी ३ इंच पाइपलाइन टाकण्यात आले आहे व खोलीच्या बाबतीत पण असाच प्रकार घडला असून १ ते दिड फूट अंतरावर खोदून पाइपलाइन टाकण्यात आले. त्याचप्रमाणे ईस्टीमेट मध्ये दर्शवलेले पाईप आणि प्रत्यक्षात टाकलेलं पाईप यात खूप तफावत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर १ . तूळशिराम पूठावार ते बंडूजी मेश्राम, २. तूळशिराम पूठावार ते ॠषीजी केळझरकर ,३. ॠषीजी केळझरकर ते बंडूजी मेश्राम सदर तिन्ही रोडचे पाईप लाईन ईस्टिमेट मध्ये व ठराव मध्ये नमूद केलेले होते परंतु तिन्ही ठिकाणी नवीन पाईप लाईन टाकण्यात आले नाही, या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन येरगाव ग्रामपंचायत चे नवयूवक उत्तम आळे, विनोद मडावी,राजू नागापरे, प्रशांत मडावी, पंकज गेडाम,मनोज मडावी, महेश कोवे, अजय मडावी, आतिश मडावी, निखिल ,दया कोवे,कोपेश कोवे,मून्ना, आकाश, नयन, पंकज गेडाम, उत्तम आले, विनोद मडावी,राजू नागापुरे ,मनोज मडावी,अभिषेक पेंदाम, महेश कोवे,अजय मडावी,निलेश गेडाम प्रशांत मडावी,आकाश पेंदाम,आतिश मडावी,कोपेश कोवे तसेच नवयुवक अणि समस्त गाावकऱ्यांनी दिले आहे. वरील प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी येरगांव वाहिन्यांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here