नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर आता ब्रॉडगेज मेट्रोने जोडणार !

0
97

नागपूरसाठी ब्रॉडगेज मेट्रोला बुधवारी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. नागपूरहून ब्रॉड गेज मेट्रो सुरू व्हावी आणि सुमारे १00 किलोमीटरचा नागपूरजवळील परिसर ब्रॉडगेज मेट्रोने जोडला जावा अशी संकल्पना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची केली होती. ही संकल्पना प्रत्यक्षात यावी यासाठी गडकरी यांनी प्रयत्न केले. ब्रॉड गेज मेट्रो प्रकल्प म्हणून हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने मंजूर केल्याबद्दल ना. गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व ना. एकनाथ शिंदे तसेच संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले.
भारतीय रेल्वे, महाराष्ट्र शासन आणि महामेट्रो यांच्यात १६ जुलै २0१८ मध्ये करार करण्यात आला. ब्रॉडगेज मेट्रोचे नेटवर्क हे नागपूर ते वर्धा, नागपूर ते काटोल, नरखेड, नागपूर ते रामटेक, नागपूर भंडारा, नागपूर ते वडसा देसाईगंज, चंद्रपूर, असे असेल. ब्रॉडगेज मेट्रोमुळे पूर्वीपेक्षा अध्र्या वेळात प्रवास करणे शक्य होणार आहे. वध्र्याला केवळ ३५ मिनिटात पोहोचणे शक्य होणार आहे. शहरातील खापरी, अजनी आणि नागपूर रेल्वे स्टेशन इंटरचेंजसाठी जवळच्या मेट्रो स्टेशनमध्ये एकत्रित करण्यात येतील. याचा फायदा शहरातील वाहतुकीसाठीही होणार आहे. ब्रॉडगेज मेट्रोचा डीपीआर तयार झाला असून प्रकल्पाची किंमत ३0५ कोटी रुपये असून राज्य शासनातर्फे २१. ४ कोटी या प्रकल्पासाठी मिळतील. या मेट्रोच्या डीपीआरला रेल्वे बोर्डाने २0१९ मध्येच मान्यता दिली असून डीपीआरमधील काही त्रुटी आणि निधीसाठी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. शहरातील महामेट्रोचा खर्च ३५0 कोटी रुपये प्रती किलोमीटर असा असताना ब्रॉडगेज मेट्रोसाठी मात्र फक्त ५ कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्च येणार आहे. ब्रॉडगेज मेट्रोसाठी मध्य रेल्वेचे ट्रॅक, सिग्नल आणि स्टेशनचा वापर केला जाईल. तासी १२0 किलोमीटर या वेगाने ही मेट्रो धावणार असून प्रत्येक स्टेशनवर सुमारे एक ते दीड मिनीट (मुंबई लोकलप्रमाणे) एवढा वेळ मेट्रो थांबेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here