कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाइन पोर्टल वर प्रसिद्ध ; शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

0
37
कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाइन पोर्टल वर प्रसिद्ध ; शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 11 जुलै: महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत ऑनलाईन पोर्टलवर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यानुसार सेतू सुविधा केंद्र, एएसएसके, सीएससी, संग्राम केंद्र व बँकांकडे उपलब्ध सुविधेनुसार प्रसिद्ध झालेल्या यादीतील शेतकरी त्यांचे आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ घेत आहेत. जिल्ह्यातील 2 हजार 800शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही त्यांचे आधार प्रमाणीकरण केले नाही अशा शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता त्यांचे जवळच्या सुविधा केंद्र, एएसएसके, सीएससी, संग्राम केंद्रावरून किंवा त्यांचे संबंधित बँक शाखेस तात्काळ संपर्क करून त्यांचे आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

प्रसिद्ध झालेल्या यादीतील शेतकऱ्यांना संबंधित बँकांमार्फत कर्जमुक्ती रकमांचा त्वरित लाभ देण्याची कार्यवाही करून सदर योजना पूर्ण केली जाईल व पुढील विस्तारित कर्जमुक्ती योजना सुरू करण्यास विलंब होणार नाही. तसेच सदर योजनेच्या मुख्य उद्देशानुसार योजनेस पात्र असलेले सर्वच शेतकरी सन 2020-21 या हंगामामध्ये पिक कर्ज घेण्यासही पात्र ठरणार आहेत,असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.◼️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here