महास्वयम संकेतस्थळावर बेरोजगार युवक-युवतींनी 15 ऑगस्ट पर्यंत नोंदणी अद्यावत करावी

0
83
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे आवाहन

चंद्रपूर,दि. 5 ऑगस्ट: कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. राज्य शासनाने कामगार हवे असलेल्या कंपन्यांना व रोजगार हवा असलेल्या कामगारांना संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे ज्या बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची आवश्यकता आहे. त्यांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केलेली नाही. त्यांनी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

ज्या उमेदवारांनी यापूर्वी नोंदणी केलेली आहे. त्यांनी आपली प्रोफाईल दिनांक 15 ऑगस्ट 2020 पर्यंत अद्यावत (जसे- संपूर्ण शैक्षणिक पात्रता, अनुभव, अवगत असलेल्या भाषा, स्किल इ) करावी. जे उमेदवार नोंदणी अद्यावत करणार नाही, त्यांची स्वतःची नोंदणी दिनांक 15 ऑगस्ट 2020 नंतर आपोआप पोर्टलवरून रद्द होईल.

सदर नोंदणी ही विनामुल्य आहे. अधिक माहितीसाठी, काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, पहीला माळा, हॉल क्र.5/6 चंद्रपूर या कार्यालयाशी किंवा 07172- 252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here