कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणिकरण, मयताचे वारस लावण्याची प्रक्रीया पूर्ण करा : उपनिबंधक

0
23

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019

चंद्रपूर, दि. 3 ऑगस्ट : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ची अंमलबजावणी सुरू असून पात्र लाभार्थ्याची पाचवी यादी शासनाने पोर्टलवर प्रसिध्द करण्यात केली आहे. ज्या पात्र शेतक-यांची  नावे यादीत आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मय्यत खतेदारांच्या बाबतीत त्यांचे वरसांनी संबंधित बँकेत वारस लावण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर यांचे वतीने करण्यात येत आहे.

सदर योजनेच्या अनुषंगाने जिल्हात आजपर्यत बँकामार्फत सदर योजनेच्या पोर्टलवर पाच याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत. या याद्यामध्ये 58647 शेतक-यापैकी 55300 लाभार्थी  शेतक-यांचा समावेश आहे. यातील 53209 शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण पुर्ण केलेले असून 41703 शेत-यांच्या खात्यात 262.19 कोटी रूपये जमा करण्यात आलेले आहे. तसेच 2091 शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण केलेले नसल्यामुळे त्यांना अद्यापही लाभ मिळालेला नाही. यांत प्रामुख्याने बँकनिहाय अलाहाबाद बँक-6, आंध्रा बँक-1, बँक ऑफ इंडिया -162, बँक ऑफ महाराष्ट्र-102, कॅनरा बँक-7, सेंद्रल बँक ऑफ इंडिया -1, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक-1876, एसडीएफसी-6, आयडीबीआय-19, इंडियन बँक-5, स्टेट बँक ऑफ इंडिया-159, विदर्भ कोकण ग्रामीण बँक-177 इत्क्या खातेदाराचा समावेश आहे. सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक असून शेतक-यांना संबंधित बँकामार्फत सदर कर्ज मुक्ती योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही शक्य होणार आहे.

याचबरोबर कर्जमुक्ती येजनेत संपुर्ण कर्जमुक्त झालेले शेतक-यांना सन 2020-21 या हंगामध्ये पीककर्ज घेण्यासाठीही पात्र ठरणार आहे. याकरीता 7 ऑगस्टपुर्वी सिएससी केंद्रे/महाऑनलाईन केंद्रे/संग्राम केंद्रावर जावून आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे जाहिर आवाहन जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी केले आहे.

पात्र लाभार्थ्यांच्या यादीत ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण शक्य नाही. असा पर्याय निवडून तक्रार केली असेल, तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्डची स्वसाक्षांकीत छायाप्रत, तक्रार नोंदणीच्या पावती व बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची छायाकिंत प्रतीसह संबंधित तहसिल कार्यालय अथवा सहाय्यक  निबंधक सहकारी संस्था कार्यालयास संपर्क करून तक्रार निवारण संबंधित तालुकास्तरीय समितीकडून करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांनी आधार क्रमांक अमान्य अशी तक्रार नोंदवलेली असेल तर त्यांनी आपल्या आधार कार्डची स्वसाक्षांकीत छायाप्रत, तक्रार नोंदणीच्या पावती व बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची छायाकिंत प्रतीसह संबंधित संबंधित बँकेच्या शाखेत, गटसचिव यांच्याकडे किंवा संबंधित सहाय्यक  निबंधक सहकारी संस्था कार्यालयासत जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे कर्जमुक्तीच्या यादीत मयत खातेदाराचे नाव असल्यास मयत खातेदाराच्या नातेवाईक अथवा कायदेशीर वारसांने आधार प्रमाणीकरण न करता प्रथम कायदेशीर वारसाने त्याची संपूर्ण माहिती 7 ऑगस्ट पर्यत संबंधित बँक शाखेस पुरवावी व बँकेच्या नियमाप्रमाणे वारस लावण्याची प्रक्रिया पूर्ण करून वारसाची नोंद कर्जखात्यास करून घ्यावी. वारसाच्या नोंदीची माहिती बँक 7 ते 14 ऑगस्ट या कालावधीत पोर्टलवर भरू शकणार असल्याने या बाबतीत मयत खातेदारांच्या वारसाने त्यांचे स्तरावर देखील वारस लावून घेण्याच्या बाबतीत व विहित मुदतीत दुरूस्त केलेली माहिती पोर्टलवर अपलोड करण्याच्या बाबतीत विहित मुदतीत कारवाई करणे आवश्यक आहे.

सदर योजनेअंतर्गत कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतक-यांनी नवीन पीक घेण्यासाठी संबंधित गटसचिव, संबंधित बँक शाखेशी आवश्यक त्या कागदपत्रासह संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here