जिल्ह्यात आजपासून 26 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन

0
6

जिल्ह्यात आजपासून 26 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन

◼️ नागरिकांनी लॉकडाऊन पाडण्याचे आवाहन

◼️ चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 218

◼️  आज गुरूवारी आणखी 5 कोरोना बाधित

◼️ उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 98

◼️ 120 बाधित कोरोनातून बरे

चंद्रपूर, दि. 16 जुलै: चंद्रपूर शहर महानगर पालिका क्षेत्र, चंद्रपूर तालुक्यातील ऊर्जानगर व दुर्गापूर ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवार 17 जुलै ते रविवार 26 जुलै पर्यंत एकूण 10 दिवस कडेकोट टाळेबंदी अर्थात लॉकडाऊन असणार आहे. या काळात कोणीही बाहेर पडू नये. नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.

जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या 218 झाली आहे. यापैकी 120 बाधित कोरोनातून बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 98 बाधितांवर उपचार सुरू आहे. यापैकी 17 जन जिल्ह्याबाहेरील बाधित असून राज्य राखीव पोलीस दलाचे 11 जवान व 6 जन अन्य राज्याचे रहिवासी आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार कालपर्यंत 213 असणारी संख्या आज 5 बाधिताची भर पडल्यामुळे 218 झाली आहे. 5 बाधितामध्ये जिल्ह्यातील तालुक्याच्या व ग्रामीण भागातील नागरिकांचा सहभाग आहे.

यामध्ये नागभीड तालुक्यातील तेलीमेंढा या गावातील 49 वर्षीय केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी येथे कार्यरत असलेला हा जवान चंद्रपूरला 12 जुलै रोजी पोहोचला. आल्यानंतर गृह अलगीकरणात होता. 14 जुलैला त्यांच्या स्वॅब घेण्यात आला असून तो पॉझिटिव्ह ठरला आहे.

ब्रह्मपुरी शहरातील विद्यानगर परिसरात राहणारी 25 वर्षीय युवती गोरेगाव मुंबई येथून परत आली आहे.ती आल्यापासूनच संस्थात्मक अलगीकरणात होती. 14 तारखेला स्वॅब घेण्यात आला. 16 जुलैला ती पॉझिटिव्ह ठेवली आहे.

गोंडपिंपरी येथील 33 वर्षीय फॅक्टरीमध्ये काम करणारे कामगार बिहार येथून रेल्वेने परत आले आहे. आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात होते. 13 तारखेला त्यांचा स्वॅब घेण्यात आला असून तो पॉझिटिव्ह ठरला आहे.

हैद्राबाद येथे एका बिस्कीट कंपनीत काम करणाऱ्या 26 वर्षीय युवकाचा स्वॅब देखील पॉझिटिव्ह आला आहे. हैद्राबाद येथून 30 जूनला आल्यानंतर आता पर्यत दोन वेळा त्याची चाचणी केली असता, दुसरी चाचणी पॉझिटिव्ह ठरली आहे.

माणिकगड सिमेंट मध्ये काम करणाऱ्या एका अभियंत्याचा स्वॅब देखील पॉझिटिव्ह आला आहे. नोएडा येथून रेल्वेने 14 जुलै रोजी माणिकगड येथे आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात असलेला हा युवक पॉझिटिव्ह ठरला आहे. यासोबतच गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी एकूण पॉझिटिव्ह संख्या 218 झाली आहे. सध्या जिल्ह्यात 98 संक्रमित असून त्यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये 75, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात 23 असे मिळून एकूण 98 जणांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून आतापर्यंत जिल्ह्यात कोणत्याही बाधिताचा मृत्यू झालेला नाही .

कोविड-19 संक्रमित 218 बाधितांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून, रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील देशनिहाय, राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. साऊथ आफ्रिका एक, कजागिस्तान एक, दिल्ली -9, हरियाणा (गुडगाव) दोन, ओडीसा एक, तेलंगाना दोन, गुजरात चार, हैद्राबाद-23, नागपूर 6, अकोला दोन, वाशिम एक, मुंबई-16, ठाणे पाच, पुणे-12, नाशिक चार, जळगांव एक, यवतमाळ -7, औरंगाबाद चार, कोल्हापूर तीन, श्रीनगर एक, पटना एक, अमरावती एक, राजस्थान चार, अलाहाबाद एक, बंगलोर एक, सिंगापूर एक, बालाघाट एक, झारखंड दोन, बिहार दोन, उत्तर प्रदेश एक, प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेले-13, संपर्कातील व्यक्ती 85 आहेत.

◼️ तालुकानिहाय बाधितांची संख्या:

ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर-27, बल्लारपूर तीन, पोंभूर्णा तीन, सिंदेवाही तीन, मुल 10, ब्रह्मपुरी 26, नागभीड पाच, वरोरा 8, कोरपना चार, गोंडपिपरी तीन, चिमूर दोन, भद्रावती पाच बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर पाच, वरोरा 14, राजुरा तीन, मुल एक, भद्रावती 10, ब्रह्मपुरी-19, कोरपणा, नागभिड प्रत्येकी एक तर गडचांदूर चार बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोन, बिनबा गेट एक, बाबुपेठ 6, बालाजी वार्ड दोन, भिवापूर वार्ड दोन, शास्त्रीनगर एक, सुमित्रानगर चार, स्नेह नगर एक, लुंबीनी नगर 4, जोडदेउळ एक, तुकूम तलाव दोन, दूध डेअरी तुकूम दोन, लालपेठ एक, पोलीस मंगल कार्यालय तुकूम 11, दाद महल वार्ड, शिवाजी नगर तुकुम, इंदिरानगर तुकुम, लालपेठ, भानापेठ, बगल खिडकी, हवेली गार्डन, नवीन वस्ती दाताळा, लखमापूर हनुमान मंदिर, घुटकाळा , आजाद हिंद वार्ड तुकूम , अंचलेश्वर गेट, संजय नगर याठिकाणचे प्रत्येकी एक बाधित तर पागलबाबा नगर तीन, वडगाव दोन, सिविल लाइन्स तीन असे एकूण बाधितांची संख्या 218 वर गेली आहे.◼️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here