चंद्रपूर शहर, ऊर्जानगर व दुर्गापुर क्षेत्रातील औषधालय, मेडिकल दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 9 सुरु राहणार

0
18

चंद्रपूर शहर, ऊर्जानगर व दुर्गापुर क्षेत्रातील औषधालय, मेडिकल दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 9 सुरु राहणार

चंद्रपूर, दि. 23 जुलै: चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर तालुक्यातील ऊर्जानगर आणि दुर्गापुर ग्रामपंचायत क्षेत्रातील औषधालय, मेडिकल दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 9 या वेळेत सुरु राहतील तसेच ऑनलाईन औषध वितरण व सेवा आणि रुग्णालय संलग्न औषधांची दुकाने 24 तास सुरु राहतील. याविषयीची माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आदेश काढून दिलेली आहे.

यापूर्वी, सर्व मेडिकल दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरु राहतील तथापी ऑनलाईन औषध वितरण व सेवा व रुग्णालय संलग्न औषधांची दुकाने 24 तास सुरु राहील असे आदेशीत केलेले होते. यामध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे.

सदरचा आदेश चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर तालुक्यातील ऊर्जानगर आणि दुर्गापुर ग्रामपंचायत क्षेत्रात  22  जुलै ते  26 जुलै या कालावधीत लागु राहील.◼️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here