स्थानिक गुन्हे शाखेने केली अट्टल गुन्हेगारांना शिताफीने अटक !

0
34

जिवंत काडतुसे व देशी-विदेशी कट्यासह 5 लाखांपेक्षा जास्त मुद्देमालासह आरोपीस अटक !

चंद्रपूर : सोमवार दि. 20 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत जिवंत काडतुस व देशी-विदेशी कट्यासह विविध ठिकाणी करण्यात आलेला चोरीचा जवळपास पाच वर्षांपेक्षा ही जास्त मुद्देमालासह आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. आरोपींकडून आणखी गुन्ह्याचा शोध लागु शकतो काय पोलिस प्रयत्नशिल आहे.

आरोपींना पोलीस कोठडी रिमांड मिळाला असुन त्यांचेकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढिल तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे. सदरची कार्यवाही डॉ.श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक चंद्रपुर व अपर पोलीस अधीक्षक चंद्रपुर श्री. प्रशांत खैरे यांचे मार्गदर्शनात पोनि. स्थागुशा श्यामप्रकाश कोकाटे, यांचे नेतृत्वात जितेंद्र बोबडे, विकास मुंढे, सचिन गदादे, हवा. केमेकर, संजय आतकुलवार, धनराज करकाडे, अमोल धंदरे, गोपाल आकुलवार, प्रशांत नागोसे, रवी पंधरे, जावेद सिददीकी, प्रफुल मेश्राम व दिनेश सर्व चंद्रपुर यांनी पार पाडली.

सविस्तर वृत्त असे की, पोलीस स्टेशन माजरी अप.क्र.154/20 कलम 353 भा.दं.वि. सहकलम 4,25 भा. ह.का चे गुन्ह्यातील फरार आरोपी नामे शाहरुख अस्लम शेख (22), रा. बांदा दफाईल नं. 2 माजरी हा त्याचा साथीदार राकीब सगीर अहमद सिद्दीकी (20) रा. शिवाजीनगर माजरी हे हत्यारासह त्यांचे पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन Hyundai GETZ गाडी क्र. MH-34K-8030 ने मौजे खुटाळा, पो.स्टे. पडोली हद्दीमध्ये फिरत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी 20 जुलै रोजी सापळा रचला, यात आरोपी नामे शाहरुख अस्लम शेख हा त्याचा साथीदार राकीब सगीर अहमद सिद्दीकी हे दोघे मौजा खुटाळा येथे मिळालेल्या माहितीप्रमाणे वरील क्रमांकाच्या चारचाकी वाहनासह त्याठिकाणी आढळले, पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी विरोध करून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने शिताफीने त्यांना पकडुन त्यांची झडती घेतली असता, त्यांचेजवळ एक विदेशी बनावटीचा कट्टा(माउझर), चार जिवंत काडतुससह व एक देशी बनावटीचा कट्टा तसेच तलवार, चाकु असा माल आरोपीतांकडुन जप्त करून त्याबाबत पो.स्टे. पडोली येथे अप.क्र.139/20 कलम 353, 307, 34 अन्वये भा.दं.वि. सहकलम 3, 4, 25 भा.ह.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
अधिक तपासादरम्यान आरोपींनी एकता नगर तेलवासा येथे केलेली घरफोडी तसेच पोस्टे घुग्घुस हदीतील मंदीरातील चोरी व माजरी येथील चोरी केल्याचे कबुल करून आरोपी राहत असलेल्या मौजा खुटाळा येथील त्यांचे घर झडतीत 1) 24 ग्रॅम वजनाची सोन्याची चपलाकंठी, (67,200/- रुपये), 12 ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप (33,600/- रुपये) 9 ग्रॅम वजनाचे दोन टॉप्सवेल टॉप्स सहित (9000/- रुपये), प्रत्येकी 3 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (16,800/- रुपये), 4 ग्रॅम वजनाचे दोन मणी असलेले डोरले (11,200/- रुपये), दीड ग्रॅम वजनाची D ची प्रिंट असलेली अंगठी (5000/-रु.), 1 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट (2000/- रु.), 100 ग्रॅम वजनाच्या दोन चांदीच्या पायपटट्या (6000/- रुपये), 20 ग्रॅम वजनाचा चांदीचा WCL चा शिक्का (1000/-रुपये), नगदी 25,000/- रुपये, तसेच एक Indane कंपनीचा घरगुती गॅस सिलेंडर, (1500/- रुपये)., एक कुलरचा टब (300/- रुपये), एक SANSUI कंपनीचा एल.सी.डी. टी. व्ही.
(2000/- रुपये), होम थिएटर साऊंड्स, (500/- रुपये), 3 सिन्थॉल, 3 फाँग कंपनीचे बॉडी स्प्रे किं.अं. 500/- रुपये, एक रुपयांचे 150 नाणी, 2 रुपयांचे 135 नाणी, 5 रुपयांचे 19 नाणी. 10 रुपयांचे 10 नाणी, असे एकुण 615/- रुपये तसेच इतर रोख रक्कम असे एकुण 4300/- रुपये. एक लोखंडी एक लोखंडी आरी किं अं. 50/- रु. त्याचप्रमाणे आरोपीतांकडुन दोन टामी किं.अं. 100/- रु. 8) दुचाकी Bajaj Pulsar मो.सा. किं. 50,000/-रू, 1) Honda CBR मो.सा. क्र. MH-27AY-5957 (50,000/- रु.), विना क्रमांकाची सदर कार्यवाही मध्ये सोने चांदीचे दागीने, नगदी रोख, एक चारचाकी वाहन, दोन दुचाकी वाहन, देशी विदेशी कटटा व चार जिवंत काडतुससह एकंदर 5 लाख 43 हजार 350/ रू.चा मुददेमाल आरोपीकडुन जप्त केला आहे.
पोलीस स्टेशन भद्रावती येथे आरोपींवर अप.क्र. 344/20 कलम 454, 457, 380 भा.दं.वि., 374/20 कलम 454, 457, 380 भा.दं.वि., पोलीस स्टेशन माजरी येथे अप.क्र. 124/20 कलम 461,380 भा.दं.वि., पोलीस स्टेशन घुग्घुस येथे अप.क्र. 26/20 कलम 457, 380 भांदवि असे गुन्हे उघडकीस आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here