जिल्ह्यात 24 तासात 187 बाधित ; तीन बाधितांचा मृत्यू

0
8

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 8843 बाधित कोरोनामुक्त

बाधितांची एकूण संख्या 12077 ; उपचार सुरु असणारे बाधित 3050

जिल्ह्यात 24 तासात 187 बाधित ; तीन बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर, दि.11 ऑक्टोंबर: आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 187बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 12 हजार 77 वर पोहोचली आहे.  8 हजार 843जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.  सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 50बाधितांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात  24 तासात तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, सावली येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 7 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू भानापेठ वार्ड, चंद्रपुर येथील 69वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 10ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तर, तिसरा मृत्यू  सौगत नगर तुकुम, चंद्रपुर येथील 59 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 5 ऑक्टोबरला मानवटकर हॉस्पीटल, चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते. पहिल्या व दुसऱ्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे. तर, तिसऱ्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने मानवटकर हॉस्पीटल,चंद्रपूर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 184 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 175, तेलंगाणा एक,बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 65, बल्लारपूर तालुक्यातील 15, चिमूर तालुक्यातील एक, मुल तालुक्यातील 11,गोंडपिपरी तालुक्यातील पाच, जिवती तालुक्यातील एक,  कोरपना तालुक्यातील पाच, ब्रह्मपुरी तालुक्यातील 22,नागभीड तालुक्यातील 11,  वरोरा तालुक्यातील 20, भद्रावती तालुक्यातील 10, सावली तालुक्यातील तीन,  सिंदेवाही तालुक्यातील 9, राजुरा तालुक्यातील साततर गडचिरोली व यवतमाळ येथील प्रत्येकी एक असे एकूण 187 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील अंचलेश्वर वॉर्ड, संजय नगर, नगीनाबाग, रयतवारी कॉलनी परिसर, भानापेठ वार्ड, शक्तिनगर, बाबूपेठ, लालपेठ कॉलरी परिसर, संत नगर दुर्गापुर, तुकूम, वैशाली नगर, भिवापुर वॉर्ड, जटपुरा गेट, सिंधी कॉलनी परिसर, रामनगर, कृष्णा नगर, इंदिरानगर भागातून बाधित पुढे आले आहे.

 

 

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील बालाजी वार्ड, कन्नमवार वार्ड, कळमना, गोकुळ नगर, साईबाबा वार्ड, विवेकानंद वार्ड, डब्ल्यूसीएल कॉलनी परिसर, विद्यानगर,विसापूर परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील विवेकानंदनगर, चुनाभट्टी वार्ड, बामणवाडा, गोवरी कॉलनी परीसर भागातून बाधित ठरले आहे.

वरोरा तालुक्यातील गांधिनगर, आनंदवन, बावणे लेआउट परिसर, अभ्यंकर वार्ड, चिनोरा, देशपांडे लेआउट, जिजामाता वार्ड, शांतीवन लेआउट परिसरातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील विदर्भ टाउन परिसर,खंडाळा, ज्ञानेश नगर, देलनवाडी वार्ड, शांतीनगर, कुर्झा, मालडोंगरी,गुजरी वार्ड, शेष नगर, मेंढकी, खेड मक्ता भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

भद्रावती तालुक्यातील माजरी कॉलरी, झिंगोजी वार्ड, किल्ला वार्ड, शिवाजीनगर, श्रीकृष्णा नगर, बाजार वार्ड, परिसरातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील काचेपार, नवरगाव, लोनवाही, गुंजेवाही, पळसगाव, नांदगाव परिसरातून बाधित ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील कोजबी,ओवाळा, चावडेश्वरी, गिरगाव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.मुल तालुक्यातील जूनासुर्ला, राजगड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर, पिंपळगाव, उपरवाही, माणिक गड कॉलनी परिसर भागातून बाधित पुढे आले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील शिवाजी चौक, इंदिरानगर परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.◼️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here