24 तासात आणखी 159 बाधित ; चार बाधितांचा मृत्यू

0
4

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 11026

7558 बाधित कोरोनातून  झाले बरे;उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 3301

24 तासात आणखी 159 बाधित ; चार बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर, दि. 4 ऑक्टोंबर : जिल्ह्यामध्ये 24 तासात आणखी 159 कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 11 हजार 26 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 3 हजार 301 असून आतापर्यंत 7 हजार 558बाधित कोरोनातून बरे झाले आहेत.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, भद्रावती येथील 67 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 1 ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू साईबाबा वार्ड, बल्लारपूर येथील  59 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू आकाशवाणी चौक, चंद्रपुर येथील 68 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तर, चवथा मृत्यू बालाजी वार्ड, चंद्रपुर येथील 50वर्षीय महिला बाधितेचा  झाला आहे. या बाधितेला 1ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. चारही मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह न्यूमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 167 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 158, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 77, बल्लारपूर तालुक्यातील 14, चिमूर तालुक्यातील आठ, जिवती तालुक्यातील एक,  कोरपना तालुक्यातील सहा, ब्रह्मपुरी तालुक्यातील सहा, नागभीड तालुक्यातील पाच, वरोरा तालुक्यातील 10, भद्रावती तालुक्यातील 10, सावली तालुक्यातील 10,  सिंदेवाही तालुक्यातील आठ, भंडारा व पुणे येथील प्रत्येकी दोन असे एकूण 159 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातून गंज वार्ड, दुर्गापुर, महाकाली वार्ड, बापट नगर, भाना पेठ वार्ड, नगीना बाग, भिवापूर वार्ड, इंदिरानगर, रामनगर, सरकार नगर, विठ्ठल मंदिर वार्ड, बाबुपेठ, जलनगर, चिचपल्ली, लोहारा, तुकूम,सुमित्रा नगर, पंचशील चौक, स्वस्तिक नगर, बंगाली कॅम्प, बालाजी वार्ड  भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील झाकीर हुसेन वार्ड, शिवाजी वार्ड, संतोषी माता वार्ड, किल्ला वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील गांधी वार्ड, बिरसा मंदिर,सास्ती, पेठ वार्ड भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील राम वाटिका बोर्डा, माजरी, सहारा पार्क परिसर, जीएमआर क्वॉटर, चारगाव, आंबेडकर लेआउट परिसरातून बाधित पुढे आले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील शिवाजी वार्ड, खेड, विद्यानगर, गांगलवाडी परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील चंडिका वार्ड, पंचशील नगर, सुमठाणा, श्रीराम नगर, झाडे प्लॉट परिसर, किल्ला वार्ड, कोंढा, साईनगर,श्रीकृष्ण नगर, सागरा परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सावली तालुक्यातील अंतरगाव, पेंढरी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील प्रगती नगर, गोवर्धन चौक परिसर, डोंगरगाव परिसरातून बाधित ठरले आहे. चिमूर तालुक्यातील राजीव गांधी नगर, वडाळा पैकु, आंबे नेरी, टीचर कॉलनी परिसर, आझाद वार्ड, कवठाळा भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. कोरपना तालुक्यातील कोडशी, उपरवाही भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here