महाराष्ट्रातील जीएसटी संकलनात पाच टक्क्यांची वाढ !

0
104

नवी दिल्ली : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्रातून यंदाही सर्वाधिक जीएसटी संकलित करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष-२0१९ च्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलनात ५ टक्क्यांची वाढ राज्यात नोंदवण्यात आली आहे. ऑक्टोबर मध्ये राज्यातून सर्वाधिक १५ हजार ७९९ कोटींचे जीएसटी संकलित करण्यात आले आहे. गतवर्षी हे प्रमाण १५ हजार १0९ कोटी एवढे होते.
महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक राज्यातीलही जीएसटी संकलनात ५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. आर्थिक वर्ष २0१९-२0 च्या ऑक्टोबर महिन्यात कर्नाटकचा ६ हजार ६७५ कोटींच्या तुलनेत यंदा ६ हजार ९९८ कोटींचे जीएसटी संकलन करण्यात आले आहे. केंद्राला गेल्या महिन्यात एकूण १ लाख ५ हजार १५५ कोटींचा महसूल एकत्रित जीएसटीतून मिळाला. यातील सीजीएसटीतून १९ हजार १९३ कोटी, एसजीएसटीतून २५ हजार ४११ कोटी, आयजीएसटीतून ५२ हजार ५४0 कोटी तसेच उपकरातून (सेस) ८ हजार ११ कोटी रुपये मिळाले.
ऑक्टोबर महिन्यात मिळालेल्या जीएसटी महसुल गेल्या वर्षीच्या तुलनेत १0 टक्क्यांनी जास्त आहे. ऑक्टोबर-२0२0 मध्ये आयातून मिळणारे महसूल ९ टक्क्यांनी जास्त होते. देशांतगर्ंत व्यवहारातून मिळणारे महसुल ११ टक्क्यांनी अधिक होते. अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यासह महसुलप्राप्तीतही वाढ होत असल्याचे यावरून दिसून येत असल्याचे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. २0१९-२0 च्या आर्थिक वर्षात ऑक्टोबर महिन्यात केंद्राला ९५ हजार ३७९ कोटींचा महसुल प्राप्त झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here