गडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी!

0
542
  1. गडचांदूर न.प. च्या Incident commander असलेल्या डॉ. विशाखा शेळकी यांचा आता जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न !

गडचांदूर शहरामध्ये कोरोना बाबत स्थानिक प्रशासनाकडून होत असलेल्या लापरवाहीबाबत दोषींवर कारवाई करण्याची भाजप गडचांदूर शाखेची जिल्हाधिकाऱ्यांकडे गुहार !

गडचांदूर : अवघ्या तीस हजाराची लोकवस्ती असलेल्या गडचांदूर शहरांमध्ये पहिला रूग्ण मिळाल्यानंतर वृत्त लिहीस्तोवर एकंदर 14 कोरोना बाधित रुग्ण आढळले. 22 जुलै रोजी एकाच दिवशी 6 रुग्णांची भर पडल्यानंतर चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी गडचांदूर येथे आढावा बैठक घेतली. गडचांदूर शहरांमध्ये बाहेरून आलेल्यांची संख्या अधिक आहे. इन्स्टिट्यूशन कोरोनटाईन करण्यासाठी गडचांदूर शहरात सावित्रीबाई कन्या विद्यालय या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी या सेंटर मधून देखरेखीखाली असलेल्या इसमांचा या सेंटरमध्ये व्यवस्था योग्य नाही असा आरोप करणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. प्रमोद वाघमारे नावाचे न.प. चे आरोग्य कर्मचारी यांच्या सोबत वाद-विवाद करणारा हा व्हिडीओ हा संस्थात्मक विलिनीकरण कक्षात सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे सांगणारा आहे. नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी राजुरा व गडचांदूर येथे भेट दिली. गडचांदूर येथील institutional corontine सेंटर विषयी यावेळी त्यांनी आपली स्पष्ट नाराजी व्यक्त केली. सुविधांचा अभाव असलेले हे सेंटर न.प. प्रशासनाच्या नाकार्तेपणा दर्शविणारे आहे. गडचांदुर न.प. च्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांचा त्यांच्या कर्मचाऱ्यांवर वचक नाही,
यापूर्वी भीम आर्मी संघटनेचे मदन बोरकर यांच्यासोबत डॉ. विशाखा शेळकी यांनी केलेली गैरवर्तणूक याची व्हिडीओ ऑडिओ व्हायरल झाले होते, मदन बोरकर यांनी फक्त c.o. मॅडमला रेस्टॉरंटमध्ये पार्टी होत आहे अशी जागरूक नागरिक या नात्याने सूचना दिली होती आणि त्यांनी त्यांचे सोबत बोललेली बातचित ही अधिकाऱ्यांना शोभणारी नाही. असे एक ना अनेक प्रकरण आहेत. भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या पाठिशी राहून आम्ही पवित्र असे सोंगाडे आज गडचांदूर मध्ये कोरोना च्या नावाने सुरू आहेत. तुघलक स्वभावाच्या डॉ. शेळकी यांची गडचांदूर येथून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी आता गडचांदूर शहरांमध्ये जोर धरू लागली आहे. 4 जुलैला पहिला रुग्ण मिळाल्यानंतर तीस हजाराची लोकसंख्या असलेल्या गडचांदूर शहरामध्ये आज बाधितांची संख्या 13 आहे. प्रत्येक 3 हजारामागे एक रुग्ण अशी आकडेवारी समोर येत असून हा जिल्ह्यातील सगळ्यात घातक आकडा आहे. या संबंधात नुकतेच गडचांदुर भाजपने जिल्हाधिकारी व तत्कालीन वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना या आशयाचे पत्र सादर केले असून या पत्रामध्ये न.प. प्रशासनाच्या नाकार्तेपणाचे अनेक बोलके उदाहरणे देण्यात आली आहे. त्यावर जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी गडचांदूर चे नागरिक करू लागले आहेत. आत्ता रूग्ण वाढल्यानंतर ही आमची जबाबदारी नाही, असा पल्ला झाडण्याचे कार्य गडचांदूर न.प च्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी करीत आहेत. गडचांदूर न.प. च्या Incident commander म्हणून त्यांना यापूर्वीचं नियुक्त करण्यात आले होते. त्या क्षेत्रात बाधितांच्या संख्येवर नियंत्रणाची जबाबदारी ही शेळकी यांची होती. आजच्या परिस्थितीला कारणीभूत समजून डॉ. विशाखा शेळकी यांची गडचांदूर येथून हकालपट्टी करण्यात यावी, ही जनतेची रास्त मागणी आहे.

Youtube Video बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

गडचांदूर शहरात कोविड 19 बाबत स्थानिक प्रशासना कडून होत असलेल्या हलगर्जी / लापरवाहीमुळे कोरोना पसरण्याच्या शक्यतेवर उपाययोजना करून दोषींवर कार्यवाही करण्याबाबत दिलेल्या गडचांदूर भारतीय जनता पक्षाने दिलेल्या निवेदनानुसार सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून शासन प्रशासन जीव ओतून काम करीत आहे. त्याच प्रमाणे गडचांदूर शहरात सुद्धा मागील दोन तीन महिन्या पासून रुग्ण नसतांना अहोरात्र काम करीत असल्याचे दिसत होते. परन्तु आता या ठिकाणी रुग्ण वाढत असून आता पर्यंत एकूण 13 कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी दि. १९/७/२०२० आढळलेला रुग्ण हा अमरावती वरून गडचांदूर सासुरवाडीला आलेला होता. तो येताच त्याला कन्या शाळेत बोलावून डाँक्टरांनी त्याची तपासणी केली व नमुना घेण्यात आला. व त्यानंतर आपल्या आदेशा प्रमाणे त्याला संस्थात्मक अलगिकरण (बालाजी सेलिब्रेशन येथे) करण्यात आले.परंतु नगर परिषद चे आरोग्य विभाग प्रमुख स्वप्नील पिदूरकर व कर्मचारी वाघमारे यांनी त्या रुग्णाला त्यांचे सासऱ्याचे यांचे घरी जाण्याची अनुमती दिली व तो घरी गेला सदरचे घर हे प्रभाग सात मध्ये असून ती अतिशय दाट वस्ती आहे व बहुतेक सर्वच तेथे मोलमजुरी करणारे आहे आणि तो दि. १७ ,१८ व १९ ला तीन वाजेपर्यंत राजरोसपणे शहरात फिरत होता. त्याचे रिपोर्ट दि. १९/७/२०२० ला सकाळी ९.३० वाजता येऊन सुद्धा त्याला अंदाजे ४.३० , ५.०० वाजता ताब्यात घेऊन चंद्रपूर येथे घेऊन गेले.व त्याचे घरचे व शेजारी यांना सुद्धा तपासणी करिता बोलावण्यात आले तेव्हा ते लोक बाजारातून पायदळ तपासणी करिता गेले.व पायदळ घरी येताना घरगुती आवश्यक वस्तूची खरेदी करत आले.तेव्हा त्यांचा सम्पर्क अगणित लोकांसोबत आला.जेव्हा की त्यांना नेतेवेळी गाडीने नेणे आवश्यक होते परन्तु त्यांचे सोबत नगर परिषद वा दवाखान्याचे कुणीही जबाबदार व्यक्ती नव्हता. लगेच सदरचा परिसर बंद करण्यात आला व प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.त्यामुळे तेथील मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना त्याचा मोठा आर्थिक व मानसिक त्रास होणार असून त्यांना १४ दिवस वा अधिकचे रुग्ण आढळल्यास अधिक दिवस घराचे बाहेर निघणे बंधन झाले आहे.
हा सर्व प्रकार येथील स्थानिक प्रशासन नगर परिषद व डाँक्टर यांच्या हलगर्जीपणाने घडला जर त्या रुग्णाला संस्थात्मक अलगिकरण (बालाजी सेलिब्रेशन येथे) ठेवले असते तर सदरचा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र करण्याची गरज
आली नसती व इतर लोकांची तपासणी करणे .त्यांना नाहक त्रास देण्याची वा नगर परिषद ला सदरचा परिसर बंद करण्याचा खर्च व कर्मचाऱ्यावर कामाचा ताण पडला नसता. मागील पंधरा दिवसापासून शहराच्या स्वच्छतेचे ठेकेदाराचे मजूर शहराची सफाई बंद करून याच कामात गुंतले असून शहराच्या स्वच्छयतेकडे सर्रास दुर्लक्ष होत असून शहरात सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे.व पुढे लोकांना अनेक रोगांना सामना करण्याची वेळ येणार आहे तसेच यापूर्वी सुद्धा प्रभाग क्र. ३ मध्ये डाँ. खेकडे परिसरात रुग्ण आढळल्याने तेथील परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आले तेव्हा तेथील नागरिक शासनाच्या नियमाचे उल्लघन करून क्षेत्राच्या बाहेर जाऊन आंदोलन, विवाह, अंत्यविधीला उपस्थित राहत होते. परन्तु नगर प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही जेव्हा काही नागरिकांनी नगर परिषदला विचारणा केली तेव्हा केवळ दोन व्यक्तीला दंडात्मक कार्यवाई करण्यात आली परन्तु त्यात नगरसेविका ला मुभा देण्यात आली. परतु ते लोक फिरत असताना पिदूरकर यांना सांगितले असता त्यांना दंड थोटावला असल्याचे सांगत होता व ते व्यक्ती सुद्धा आम्ही दंड भरला आहे म्हणून राजरोसपणे फिरत होते.त्या भागात सुदैवाने दुसरा रुग्ण मिळाला नाही बरे झाले अन्यथा अनेक लोकांना याचा फार मोठा त्रास झाला असता.
साईशांती नगर टिचर कालनीत दि ४/७/२०२० ला एक कोरोना बाधित रुग्ण आढळला सदरचा रुग्ण व त्याची मुलगी हे आसाम वरून अनेक रेड झोन ओलांडून आले.तरी त्याला संस्थामक अलगिकरन न करता डाँक्टरनी त्यांना होम क्वांरनटीन केले.जेव्हा की त्यांचेकडे राहण्याची व शौचालयाची वेगळी व्यवस्था नव्हती. त्यामुळे त्या सर्व परिवार दि ९/७/२०२० ला कोरोना बाधित निघाले.त्यापूर्वी सदर परिवारातील लोक बाजारात जाऊन खरेदी करीत असल्याची तेथील नागरिकांनी वाघमारे यांना देऊनही दुर्लक्ष केले.त्याच वेळेस त्यांना ताकीद दिली असती वा त्यांना संस्थात्मक विलगिकरन केले असते तर तो परिसर सील करण्याची भासली नसती यात सुद्धा नगर परिषद प्रशासन व दवाखाण्यातील डाँक्टरच्या हलगर्जी , लापरवाही मुळे त्यांच्या परिवारातील लोक कोरोना बाधित झाले. व तो परिसर १७ दिवस प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आले त्यामुळे तेथील नागरिकांना मानसिक ,आर्थिक त्रास सहन करावा लागला असल्यामुळे व आता सगळीकडे कोरोना चा प्रसार वाढल्याने आधीच लोकात भीती निर्माण झाली आहे व नगर परिषद व डाँक्टरां च्या लापरवाही मुळे गडचांदूर शहरात सुद्धा कोरोना बाधित रुग्ण वाढत आहे.त्यामुळे लोकांत एक भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्यात न आल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल या आशयाचे गडचांदूर भाजप चे शहर अध्यक्ष सतिश उपलेंचीवार, नगरसेवक रामसेवक मोरे, नगरसेवक अरूण डोहे, संदिप शेरकी, निलेश ताजणे आदिंनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here