जिल्ह्यातील शासकीय वाणिज्य शिक्षण संस्था कोविड-19 च्या नियमांतर्गत सुरु !

0
209
  • शासनमान्य संगणक टंकलेखन, मॅन्युअल टंकलेखन व लघुलेखन संस्था सूरू !
  • कोविड-19 अंतर्गत केंद्र शासन-राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे पालन करणे बंधनकारक !

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदकडून शासकीय वाणिज्य संस्था सुरु करण्यास परवानगी दिलेली असल्याने चंद्रपूर जिल्हयातील सर्व शासनमान्य संगणक टंकलेखन, मॅन्युअल टंकलेखन व लघुलेखन संस्था अटी व शर्तीच्या अधिन राहुन सुरु करण्याकरिता परवानगी मिळाली असल्यामुळे आज बुधवार दि. ८ जुलै रोजी चंद्रपूर चे जिल्हाधिकारी यांनी तसा आदेश काढला आहे.

कोरोना विषाणुंचा होणारा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासनाने दिनांक 22.03.2020 पासुन लॉकडाऊन लागु केल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जानेवारी 2020 ते जून 2020 चे सत्र रद्द करण्यात आलेले होते. परंतू शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन करून आता यांना परवानगी देण्यात आली आहे.

सुरू होणाऱ्या या संस्थांना कोविड-19 अंतर्गत केंद्र शासन/राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे पालन करणे बंधनकारक राहील., जिल्हयातील सर्व शासनमान्य संगणक टंकलेखन, मॅन्युअल टंकलेखन व लघुलेखन संस्था यांची तालुकानिहाय यादी संबधीत तहसिलदार यांना सादर करावी लागेल., कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामाजिक अंतर, विद्यार्थ्यांमध्ये भौतीक दृष्टया कमीत कमी संपर्क येतील याची दक्षता घ्यावी लागेल., प्रतिबंध क्षेत्रातील संस्था सुरु करण्यास परवानगी नसेल तसेच प्रतिबंध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना जो पर्यंत त्यांचे क्षेत्र पुर्ववत सुरु होणार नाहीत तोपर्यंत प्रवेश देण्यात येऊ नये., महाराष्ट्र वाणिज्य शिक्षण संस्था (टंकलेखन, लघुलेखन आणि संगणक टंकलेखन अभ्यासक्रम) मान्यता व संचालन नियम, 1991 ची सुधारीत नियमावली, 2016 तील प्रकरण 2 मधील मुद्या क्रं. 11.2 नुसार सरावासाठी 12 x 12 चा हॉल ठेवून प्रत्येक संगणक/टंकलेखन यंत्रात किमान 7 चौरस फुट या प्रमाणात जागेची सोय करावी लागेल., विद्यार्थ्यांची उपस्थिती दररोज अद्यावत करावी. जेणेकरुन यदाकदाचित संशयीत रुग्ण आढळल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सोईचे होईल, जिल्हयातील सर्व शासनमान्य संगणक टंकलेखन, मॅन्युअल टंकलेखन व लघुलेखन संस्था सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 09.00 ते सायंकाळी 05.00 या वेळेत सुरु राहील परंतु सदर संस्था रविवार रोजी पूर्ण: बंद राहील., विद्यार्थ्यांचे बॅच प्रवेशाचे वेळेपुर्वी हॉल निर्जंतुकीकरण करावे व विद्यार्थ्यांकरिता साबनाने/हॅण्ड सॅनिटाईजर ने हात स्वच्छ धुण्याची व्यवस्था करावी तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांचे व संबधीतांचे प्रवेशावेळी थर्मल स्क्रिनींग करण्यात यावे., दोन बॅचेस मध्ये अर्धा तास अवकाश ठेवुन प्रत्येक वेळी हॉल स्वच्छ व संगणक व टंकलेखन इ. साहित्याचे निर्जतुकीकरण करुन घेणे बंधनकारक राहील., शक्यतो उमेदवाराने हॅण्डग्लोजचा वापर करावा परंतु मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील., हॉलमध्ये 05 ते 08 उमेदवार व 01 इंन्स्ट्रक्टर (अध्यापक) शिवाय इतरांना प्रवेश देण्यात येऊ नये., विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा दुरध्वनी क्रमांक घेऊन नेहमी संपर्क करावा. तसेच जिल्हा, तालुका, प्रशासन, आरोग्य विभागाचा संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावण्यात यावा. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या आरोग्य विभागाच्या दिलेल्या सुचना दर्शनी भागात लावाव्यात व त्या सुचनांचे पालन होईल यादृष्टीने कार्यवाही करावी., शक्यतो स्थानिक उमेदवारांनाचा प्रवेश द्यावा. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असावी., विद्यार्थ्यांच्या कुटूंबात अथवा निवासस्थान परिसरात कोविड-19 चा रुग्ण नसल्याची खात्री करावी., प्रत्येक उमेदवाराचे आरोग्य कार्ड तयार करुन शारिरीक तापमान, सर्दी-खोकला यांच्या दैनंदिन नोंद घेण्यात याव्यात., कोविड-19 संबधीत वेळोवेळी निर्गमीत होणारे शासन परिपत्रक, आदेश, निर्णय व या कार्यालयाकडील आदेशाचे पालन करण्यास कसुर केल्याचे निदर्शनास आल्यास संबधीत संस्थेस जबाबदार धरुन तात्काळ संस्था सील करण्यात येईल याची नोंद घ्यावी., शासनमान्य वाणिज्य शिक्षण संस्थेस घालुन देण्यात आलेल्या अटी-शर्तीचे त्यांचेकडून पालन होत आहे किंवा नाही याची पाहणी करण्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. चंद्रपूर यांची असेल.

याशिवाय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे परवानगी पत्र जा.क्रं.मरापप/जोसीसी/प्रशा/2020/1864 दिनांक 16.06.2020. अन्वये घालुन दिलेल्या अटी व शर्तीचे सुध्दा पालन करणे बंधनकारक राहील. या अटी व शर्तीचे पालन न करणारी/ उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188269270271 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here