डॉ.सुनील टेकाम यांच्या कोरोना मृत्यूमुळे चंद्रपूरकर हादरले!

0
96

उपरोक्त विषयानुरुप आज जी खंत हृदयात सल करून गेली तिथे बरेच काही प्रश्न आणी कोरोना भीती की ? त्यामागील वास्तव काय ? म्हणून डोळ्यादेखत प्रश्न उभा करून गेली, या स्थितीवर भोला संभाजी मडावी यांचा वास्तवदर्शी लेख…..!

आज एका युवा , होतकरू , जबाबदार , कर्तव्यनिष्ठ कोरोना योद्धा डॉ.सुनील टेकाम (आरोग्य वैद्यकीय अधिकारी वरोरा ) यांचे निधन झाले. त्यांचे नुकतेच लग्नं झाले होते, त्यांच्या पत्नी परिचारिका असून त्यांना मात्र दिड वर्षाची मुलगी आहे .अशाहीं परिस्थितीत ते आपला डॉक्टर धर्म बजावत होते व वरोरा इथे ह्या कोरोना काळात इमाने ऐतबारे कोरोना रुग्णांना सेवा देत होते .
अशातच अचानक त्यांना कोरोनाची लागण झाली .व त्यांनी स्वतःला चंद्रपूर येथे कोरंटाईन करून घेतले . स्वतः एक जबाबदार आरोग्य अधिकारी असल्याने त्यांनी स्वतःपासून कुठल्याही रोग्याला वा परिवाराला याची लागण होऊ नये म्हणून चंद्रपूरला कोरंटाईन करवून घेतले होते .ते चंद्रपूर येथील रेन्जर कॉलेज इथे 14 दिवस कोरंटाईन होते .15 व्या दिवशी त्यांना डिस्चार्ज होणार तर अचानक लकवा मारला व त्यांना तात्काळ चंद्रपूर covid रुग्णालय (जिल्हा सामान्य रुग्णालय , चंद्रपूर ) इथे रेंजर कॉलेज इथून दाखल केले .15 वा दिवस जसा तसा निघाला व 16 वा दिवस म्हणजे आज रोज 21/08/2020 ला सकाळी त्यांच्या भगिनी व आईसोबत video call द्वारे व्यवस्थित वाटत असल्याचे बोलणे झाले पण त्यानंतर दुपारी 12:00 वाजता दरम्यान त्यांच्या प्रकृतीत बिघाड येत असल्याचे कळाले. ह्या दरम्यान त्यांना नागपूरला हलविण्याचे हीं सूत्र राबविल्या गेले .मात्र त्यांच्या प्रकृर्तीत सातत्याने होत असलेल्या बिघाडामुळे ते शक्य झाले नाही. ह्या दरम्यान डॉ.प्रवीण येरमे , डॉ.हेमचंद कन्नाके(निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा सामान्य रूग्णालय) , डॉ.शारदा प्रवीण येरमे यांनी अत्यंत कसोशीने जबाबदारी सांभाळली . कल्पनाताई ब्रह्मानंदजी मडावी ह्या डॉ.सुनील टेकाम साहेबांच्या मावशी लागतात, त्यामुळे त्यांनी आम्हांला सकाळला फोन करून सूचना दिल्यामुळे मी, कृष्णाजी मसराम व भय्याजी उईके त्या क्षणी सामाजिक जबाबदारी अंतर्गत जातीने हजर राहुन जे शक्य होईल ते प्रयत्न केले पण सर्वांचे प्रयत्न निष्फळ ठरले कारण एक योद्धा झुंज देता देता निसर्ग शक्तीत विलिन झाला होता .
ह्या दरम्यान समाज बांधवांना हीं माहीती कळताच बांधवांनी एकोपा दाखवत शहीद स्तरावर मानवंदना व्हावी अशी मागणी लावली परंतु आम्ही आधीच आ.किशोरभाऊ जोरगेवार (चंद्रपूर विधानसभा), आ.अशोकजी उईके (राळेगाव विधानसभा) यांच्या वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना ह्याबाबतीत सूचना केल्या होत्या परंतु covid रुग्ण असल्याने प्रेतासोबत तिरंगा जाळल्या कसा जाईल हा सर्वात मोठा पेच निर्माण झाला होता व त्यासंबंधी अधिकची माहीती नसल्याने प्रशासनात हा चर्चेचा विषय बनला पण डॉ.प्रवीण येरमे यांनी व समाजबांधवांनी जो तगादा लावला होता .त्यामुळे वरिष्ठाला पाठपुरावा करण्यात आला व जसं सुरुवातीच्या काळात पोलिस खात्यातील काही पोलिसांना covid मुळे वीरगती प्राप्त झाली होती तो नियम इथेहीं लागु व्हायला पाहिजेच म्हणून आम्ही आ.किशोरभाऊ जोरगेवार यांना रुग्णालयात बोलवून घेतले व ते लगेच आल्यानंतर त्यांनी परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाशी बोलून तोडगा निघावा म्हणून जी भुमिका घेतली हीं एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जबाबदारी होतीच व ती त्यांनी पार सुद्धा पाडली म्हणून डॉ.सुनीलजी टेकाम यांना राष्ट्रीय ध्वजात मानवंदना देण्यात आली असही म्हणता येईल .
बंधुनो ह्या दरम्यान प्रशासनाचा भोंगळ कारभार हीं दिसून आलाच. स्थानिक प्रशासन कां म्हणून किंवा कूठे दुर्लक्षित झाले म्हणून एका आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्याला जीव गमवावा लागला ? हा प्रश्न सातत्याने पुढे येत होता पण ती वेळ नव्हती व समाजभावना उद्रेकी झाल्या असत्या तर कदाचित वेगळे वळण पुढे आले असते .पण आता तो वीर योद्धा आम्ही गमावला होता व त्याच्या परिवाराला लक्षात घेता प्रशासनालाहीं समझुन घेणे गरजेचे होते .शेवटी आम्ही बघूनच राहिलो की , कोरोनावर वास्तविक द्रुष्टीने प्रशासन व सरकार किती सजग आहे व किती नाही .म्हणून नुसतं स्थानिकांना दोष देऊन परिस्थिती चिघळणे योग्य नव्हते .
पण याचा विचार होने नितांत गरजेचे आहे की , जेव्हा एका आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्याला ज्याचे वय केवळ 34 वर्षं त्याला ह्या covid मधून सावरण्यात आरोग्य प्रशासन असमर्थ ठरत असेल तर सामान्य व्यक्तीचे काय ? म्हणून बंधुनो covid होईल असेल वागु नका व रुग्णालयाची पायरी चढू नका आणी स्वतःचा जीव धोक्यात घालू नका .
हेच ह्या आजच्या प्रकारातून मला समजलं .
काळजी घ्या व इतरांनाहीं काळजी घ्यायला सांगा .
कारण कोरोना किती आहे किंवा नाही आहे पण कोरोनाची जी भीती व राबवीणारी जी प्रक्रिया आहे ती निश्चितच तुमच्या आमाच्या सर्वांसाठी जीवघेणी आहे .

शहीद वीर डॉ.सुनीलजी टेकाम अमर है , अमर रहेंगे !

भोला मडावी, 9372369255

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here