भाजपचे नगरसेवक अरूण डोहे व न.प. उपाध्यक्ष जोगी आमने-सामने!

0
10

गडचांदूर न.प. क्षेत्रात ‘डुकरांच्या मुक्त संचारा’ची समस्या !

गडचांदुर : गडचांदुर शहरामध्ये मोकाट फिरणाऱ्या डुकरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गडचांदुर नगर परिषद प्रशासनाला याबाबत नागरिकांनी अनेकदा निवेदने ही दिली आहेत, कोरोनाच्या बिकट परिस्थितीनंतर आता गडचांदुर न.प. चे उपाध्यक्ष शरद जोगी व भाजपचे नगरसेवक अरूण डोहे आता आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कोरपना तालुक्यातील काही व्हॉटस् ग्रुप वर गडचांदुर मध्ये मुक्त संचार करणाऱ्या डुकरांचे (वराह) यांचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर गडचांदुर न.प. चे उपाध्यक्ष शरद जोगी यांनी २ जुलै रोजी व्हॉटस् ग्रुप वर ‘मोकाट जनावरे व डुकरांचा त्रास सहन करावा लागत असल्याने मी शहरवासीयांची माफी मागतो. कोरोना संकटामुळे याला वेळ लागला पण आता मी स्वतः, नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, सभापतीगण यांनी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून येत्या ८-१० दिवसात ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढू व नगरवासीयांना यातून मुक्त करू, नागरिकांनी सुद्धा यासाठी सहकार्य करण्याची गरज असल्याचे आपले मत या ग्रुप वर व्यक्त केले आहे. गडचांदुर न.प. चे भाजपचे नगरसेवक अरूण डोहे यांनी न.प. चे उपाध्यक्ष शरद जोगी यांच्या उत्तरावर प्रतिक्रिया देतांना मात्र आक्रमक पावित्रा घेत जोगी हे गडचांदुर च्या नागरिकांची दिशाभुल करीत असून नगर परिषदेचे कर्मचारी हे डुकरे पकडत नसुन डुकरे पकडण्यासाठी राजुरा येथील एका व्यक्तीला नगर परिषदेने कंत्राट दिले असल्याचे स्पष्ट करीत खोटी माहिती न.प. उपाध्यक्ष देत असल्याचे म्हटले आहे. तसेच ८-१० दिवसानंतर ही गडचांदुर शहरात डुकरांचा बंदोबस्त झालेला नसून नगर परिषदेचे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर जोगी यांचा वचक राहिलेला नसल्यामुळे न.प. चा संपूर्ण कारभार हा बेशिस्त झाला असल्याचा सरळ हल्ला उपाध्यक्ष शरद जोगी यांचेवर केला आहे.
गडचांदुर नगर परिषदेमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष व राकाँ चा उपाध्यक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद जोगी यापूर्वी ही नगरसेवक म्हणून या नगर परिषदेमध्ये होते. आता त्यांचेकडून उपाध्यक्ष पद असून भाजपच्या तिन नगरसेवकांमध्ये गडचांदुर नगर परिषदेमध्ये अरूण डोहे हे भाजपचे वजनदार नगरसेवक आहे.
गडचांदुर मध्ये मोकाट फिरणारे डुकरे ही नेहमीचचं समस्या आहे. गडचांदुरवासी यामुळे त्रस्त आहेत. आता कोरोना ची पार्श्वभूमी बघता स्वच्छतेकडे गडचांदुर न.प. दुर्लक्ष होणे हे धोकादायक आहे. गडचांदुर न.प. मध्ये कोरोना बाधित आढळल्यामुळे गडचांदुरवासी चिंतेत असुन सावधसुद्धा आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here