कोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी !

0
23
९० दिवसानंतर केंद्र सरकार ने दिला पुरावा!

लक्षणे गंभीर होत नाहीत !
लस घेतलेल्या लोकांच्या तुलनेत लस घेऊन कोरोना झालेल्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. तसेच लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही, पण त्याची तीव्रता कमी होते, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, कोरोना लस घेणे म्हणजे तुम्हाला कोरोनापासून पूर्ण सुरक्षा मिळते असे नाही. तर गंभीर आजारापासून संरक्षण मिळते. तुम्हाला कोरोना झाला तरी तो गंभीर होत नाही, त्याची लक्षणे गंभीर होत नाहीत आणि परिणामी मृत्यू टाळता येऊ शकतो.

मुंबई : कोरोना लस ठरतेय संजीवनी ठरत आहे. लसीकरणाच्या ९0 दिवसांनंतर केंद्र सरकारने पुरावा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापयर्ंत १३ कोटींपेक्षा जास्त कोरोना डोस देण्यात आले आहेत. कोवॅक्सिनचे १.१ कोटी डोस देण्यात आले आहेत. या लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर ४,२0८ आणि दुसरा डोस घेतल्यानंतर ६९५ लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. कोविशिल्ड लसीचे ११.६ कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी १७,१४५ लोकांना पहिला डोस घेतल्यानंतर आणि ५0१४ लोक दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह झाले.
लस घेतल्यानंतरही तुमची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येईल पण तुम्ही सुरक्षित आहात. त्यामुळेच तुम्ही लस घेतल्यानंतरही मास्क घालणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना कोरोनाची लागण होणार नाही, असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.
१६ जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. याला बरोबर तीन महिने पूर्ण झाले आहेत. देशात आता कोरोना लसीकरणाची व्यापी वाढवण्यात आली आहे. १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्व वयाच्या नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. तरी काही लोकांच्या मनात कोरोना लसीबाबत शंका आहे. कोरोना लस घेतल्यानंतर काही दुष्परिणाम दिसत आहेत. काही जण लस घेतल्यानंतरही कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे लोक लस घेण्यात संकोच करत आहेत.लसीकरण सुरू झाल्यापासून आतापयर्ंत देशात किती लोकांना लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली आहे, याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे आणि एकंदरच हा आकडा पाहिला तर खूपच दिलासादायक असा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here