कोरोनामुळे मानसिक स्थिती खालावत असल्याचा संशोधनातून खुलासा !

0
58

मेंदूला झालेले नुकसान अधिक !

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या मेंदूवर अधिक परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. कोरोना संसर्गानंतर उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णामध्ये कग्निटीव्ह डेफिसीट म्हणजेच मेंदूला झालेले नुकसान अधिक आहे, असे संशोधक म्हणतात. मात्र काही तज्ज्ञांनी या संशोधनाकडे अधिक सावधानतेने पाहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. एडिनबर्ग विद्यापिठातील न्यूरोइमेजिंगचे प्राध्यापक असणार्‍या जोआना वार्डलॉ यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा संसर्ग होण्याआधीच लोकांमध्ये कॉग्निटीव्ह इपॅक्ट म्हणजेच मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

नवी दिल्ली :
कोरोनाचा जगभरातील शेकडो देशांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. याच कोरोनासंदर्भात जगभरातील वेगवेगळ्या संस्था आणि प्रयोगशाळांमध्ये संशोधन सुरु आहे. कोरोनावर परिणामकारक लस शोधण्यासाठी जगभरातील १00 हून अधिक प्रयोग शाळांमध्ये संशोधन केले जात आहे. याचदरम्यान आता कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यावर मात करुन पूर्णपणे बर्‍या झालेल्या रुग्णांच्या मेंदूवर होणार्‍या परिणासंदर्भात एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संशोधनाशी संबंधित वैज्ञानिकांनी कोरोनाचा संसर्ग झालेल्यांच्या मेंदूवर या विषाणूचा खूपच वाईट परिणाम होत असल्याचे दिसून आल्याचे म्हटले आहे. कोरोना विषाणू रुग्णाच्या मेंदूवर एवढा मोठ्या प्रमाणात परिणाम करतो की मेंदूचे वय दहा वर्षांनी वाढते. म्हणजेच मेंदूच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊन तो अपेक्षित वयोमानापेक्षा लवकर अकार्यक्षम होण्याची शक्यता असते.
लंडनमधील इंपीरियल कॉलेजमधील डॉक्टर अँडम हॅम्पशायर यांच्या नेतृत्वाखाली ८४ हजारहून अधिक रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासामध्ये काही गंभीर प्रकरणांमध्ये कोरोना विषाणूचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये एखादी गोष्ट समजून घेण्याची आणि काम करण्याची शक्ती आणि क्षमता कमी होते असे या अभ्यासंदर्भात रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
या अभ्यासामधून कोरोनाच्या साथीचा मानवाच्या मेंदूवरही मोठा परिणाम होत असल्याचे स्पष्ट होत आहे. याच अभ्यासामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांबरोबरच जे यामधून पूर्णपणे बरे झाले आहेत त्यांच्या मेंदूवरही गंभीर परिणाम झाला आहे. कोरोनाचे एकही लक्षण नसलेल्या मात्र संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मेंदूवरही परिणाम झाल्याचा दावा या अभ्यास करण्यात आला आहे.
कॉग्निटीव्ह टेस्ट पद्धतीने हा अभ्यास करण्यात आला आहे. कोरोनामधून बर्‍या झालेल्या व्यक्तींची कॉग्निटीव्ह टेस्ट घेण्यात आली आणि त्यामधून समोर आलेल्या निष्कर्षांच्या आधारे अंतिम अहवाल तयार करण्यात आला. एखाद्या व्यक्तीचा मेंदू किती चांगल्याप्रकारे काम करतो हे तपासण्यासाठी कॉग्निटीव्ह टेस्ट करण्यात येते. यामध्ये लोकांना कोडी घातली जातात. सामान्यपणे अल्जाइमर म्हणजेच विसरभोळेपणाशी संबंधित आजाराबद्दल जाणून घेण्यासाठी ही चाचणी केली जाते. कोरोनाचा परिणाम जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये ८४ हजार २८५ जणांचा चाचण्यांचा अभ्यास करण्यात आला. ग्रेट ब्रिटिश इंटेलिजेंस टेस्ट नावाअंतर्गत घेण्यात येणार्‍या चाचण्यांमधील प्रश्न या रुग्णांना विचारण्यात आले होते. या सर्व उत्तरांचा एकत्रितपणे अभ्यास करुन हा अहवाल मेडरिक्सीव्ह या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here