दिवाळीत रुग्णांना कोरोना व फटाक्यांचा दुहेरी धोका !

0
43

नवी दिल्ली : गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोना संक्रमणाला तोंड देणारे भारतीय सध्या सणासुदीच्या निमित्ताने आपापल्या कामात गढून गेलेत. दरवर्षीप्रमाणेच दसरा-दिवाळी असे सण एकामागोमाग येत आहेत. परंतु, यंदाचे सणासुदीचे दिवस मात्र दरवर्षीप्रमाणे नाहीत. त्याचे कारण म्हणजे फैलावत जाणार्‍या कोरोना संक्रमणाचा धोका. याच पार्श्‍वभूमीवर देशातील तज्ज्ञांनी नागरिकांना गर्दीसोबतच विशेषत: फटाक्यांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे.
सर्दी – प्रदूषण हे मिर्शण धोकादायक आहे. त्यातच, फटाक्यांमुळे वायू प्रदूषणात आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे रुग्णांच्या अडचणी आणखीनच वाढू शकतात. कोविड १९ साठी उपचार सुरू असणार्‍या आणि या आजारातून बरे झालेल्या रुग्णांवर याचा वाईट परिणाम दिसून येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

फटाके फोडल्यानंतर छोटे छोटे कण हवेत मिसळले जातात, ज्याला आपण एअरोसोल म्हणतो. यामुळे कोविड विषाणू फैलावण्याचा धोका आणखीनच वाढतो. त्यामुळे दिवाळीत कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले. तसेच थंडीच्या दिवसांत प्रदूषणातही वाढ होते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनही वाढलेले दिसते. दिवाळीत प्रदूषण वाढल्याने दम्याच्या रुग्णांना तसेच कोविडच्या रुग्णांना श्‍वास घेण्यास त्रास निर्माण होऊ शकतो, असेही त्यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here