कोरोना नियंत्रणात आरोग्य सेतू अँप अव्वल !

0
11

कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताकडून जे प्रयत्न केले जात आहेत, त्याचे कौतुक जागतिक स्तरावरही केले जात आहे. आधी धारावी मॉडेल आणि आता भारताच्या आरोग्य सेतू अँपचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे. हे मेड इन इंडिया अँप कोरोना नियंत्रणात खूप महत्त्वाची भूमिका बजावते आहे, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
भारतात एप्रिल २0२0 रोजी भारताने आरोग्य सेतू अँप लाँच केले आहे. देशातील कोरोना संक्रमणावर लक्ष ठेवण्यासाठी, नियंत्रणासाठी आणि अलर्टसाठी भारत सरकारने हे अँप आणले. देशातील कोट्यवधी लोक हे अँप वापरत आहेत. आता जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील या अँपचे महत्त्व सांगितले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अदनोम घेब्रेयिसस यांनी सांगितले, भारताचे आरोग्य सेतू अँप १५0 मिलियनपेक्षा अधिक युझर्सनी डाऊनलोड केले आहे. या अँपच्या मदतीने आरोग्य विभागाला शहरातील हॉटस्पॉट ओळखणे आणि वेळेत मदत पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडता आली.
केंद्र सरकारने आरोग्य सेतू अँपचा वापर बंधनकारक केला आहे. हे अँप मोफत डाऊनलोड होते. युझर्सला सर्वात आधी स्वत:चे मूल्यांकन करावे लागते. हे अँप ब्ल्यूटूथ आणि जीपीएसमार्फत कोरोना संक्रमित रुग्ण किंवा संशयित कोरोना संक्रमिताच्या ठिकाणाची माहिती देते. तुमच्यापासून ५00 मीटर अंतरावर किती कोरोना रुग्ण आहेत याची माहिती तुम्हाला मिळते. यामुळे कोरोना रुग्णांची ट्रेसिंग करायलाही मदत होते.
यापूर्वी धारावी मॉडेलचीही दखल
याआधी डब्ल्यूएचओने धारावी मॉडेलचेही कौतुक केले होते. धारावीतील घरांची रचना, गल्ली, लहान घरांमुळे सोशल डिस्टन्सिंग करणे अवघड जाते. त्यामुळे सुरुवातीपासून येथे कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी पालिकेकडून प्रयत्न केला जात होता. त्यात सुरुवातीच्या दिवसात धारावीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. मात्र ही रुग्णसंख्या नंतर अत्यंत कमी झाली आहे. यामागे धारावीचे कोरोना मॉडेल फायदेशीर ठरले असल्याचे दिसून येत आहे. यासाठी डब्ल्यूएचओकडून धारावी मॉडेलचे कौतुक केले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here