महाराष्ट्रासह देशातील ५ राज्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका !

0
55

आरोग्य मंत्रालयाचा इशारा !

नवी दिल्ली : भारतातील बर्‍याच राज्यांत सणांमुळे कोरोना व्हायरसचा धोका वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. केरळ, पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये सणांमुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे गेल्या पाच आठवड्यांत कोरोनाने होणारे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.
गेल्या २४ तासांत केरळ, पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीत ४९.४ टक्के इतक्या कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सणासुदीचा काळ ही याला एक मोठे कारण असू शकते. ही अत्यंत चिंतेची बाब आहे आणि आम्ही या राज्यांच्या सरकारांशी सतत बोलत आहोत. कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांपैकी ७८ टक्के रुग्ण हे देशातील १0 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत, असे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.
गेल्या २४ तासांत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ५८ टक्के रुग्ण हे ५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगड आणि कर्नाटकचा समावेश आहे. पण गेल्या पाच आठवड्यांपासून, करोनाने होणार्‍या मृत्युचा आलेख भारतात उतरता आहे. कोरोनाने भारतात आतापयर्ंत १ लाखाहून अधिक मृत्यू झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here