बाधितांच्या १६२ च्या संख्येनंतरचा जिल्ह्यातील तुलनात्मक आढावा !

0
11
  • शासन निर्देशांचे पालन करा !
    आवश्यक असेल तेंव्हाचं बाहेर पडा !
    बाहेर निघतांना तोंड व नाक झाकून बाहेर पडा !
    गर्दीच्या ठिकाणी जाण्यास बहुतेक टाळावे !

चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवार दि. १० जुलै रोजी एकाच दिवशी १२ बाधितांची वाढ झाली आणि जिल्ह्यातील बाधितांची संख्या १६२ एवढी झाली. तत्पुर्वी एकाच दिवशी सगळ्यात जास्त म्हणजे १६ बाधित आढळले होते. आत्तापावेतो मिळालेल्या बाधितांच्या संख्येवर नजर टाकली तर जास्तीत बाधित हे गृह अलगीकरण किंवा संस्थात्मक अलगीकरणातीलचं असल्याचे दिसत आहे. गृह अलगीकरणात (होम कोरोनटाईन) असलेल्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच आवश्यक कामे असल्यासचं बाहेर पडावे, बाहेर पडतांना तोंडावर मॉस्क असणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, हात स्वच्छ धुवावे असे वारंवार प्रशासनाकडून निर्देश दिल्या जात आहे.
बाधितांच्या संख्या आता दोन आकड्यांमध्ये येत असल्याचे दिसत आहे. समाधानाची बाब म्हणजे सद्यस्थितीतील १६२ बाधितांपैकी ९३ हे कोरोनातून बरे झाले असून त्यांना सुट्टी ही देण्यात आली आहे. आत्ता फक्त ६९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये आत्तापावेतो ८ हजार २२ पाठविण्यात आलेल्या स्वॅब तपासणीपैकी १६२ नमुने पॉझिटिव्ह, ७ हजार ८७ नमुने निगेटिव्ह, ७२२ नमुने प्रतीक्षेत तर ५१ नमुने अनिर्णीत असल्याची आरोग्य यंत्रणेने माहिती दिली आहे.
ग्रामीण स्तरावरील १७१, तालुकास्तरावर ३५३, जिल्हास्तरावर ४४७ असे एकंदर ९७१ नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आत्तापावेतो बाहेरून जिल्ह्यात दाखल झालेल्या ८६ हजार ३८५ नागरिकांपैकी कोणतेही लक्षण न आढळल्यामुळे ८३ हजार ८५९ नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले असून २ हजार ५२६ नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहेत. कोविड १९ बाबतीत प्रशासन वारंवार जिल्हावासियांना सुचना देत आहे. त्याचे योग्य पालन व्हावे, अशी अपेक्षा सामान्यजणांकडून करण्यात येत आहे. प्रत्येकांनी आपली काळजी घेणे आजच्या स्थितीत गरजेचे आहे.
२ मे रोजी जिल्ह्यातील पहिला बाधित मिळाल्यानंतर मे महिन्यात एकंदर २३ बाधित, त्यापैकी २० मे ला १० तर २३ मे ७ बाधित संख्यात्मक आढळले. तर जुन महिन्यात ६६ आढळलेल्या बाधितांपैकी ७ जुन ला ११, २५ जुन ला १०, २७ जून ला ७, २९ जुन ला ८ अशा मोठ्या संख्येत एकाच दिवशी बाधितांची आकडेवारी समोर आली. जुलै महिन्यामध्ये आत्तापावेतो ६५ बाधित आढळले आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात मोठ्या संख्येने बाधितांची आकडेवारी समोर आली असुन आज जिल्ह्याने १६२ गाठले आहे. त्यातील ९३ बाधित बरे झालेले आहेत.
१६२ च्या संख्येमध्ये चंद्रपूर शहरात निदान झालेले अन्य जिल्हयातील ४ बाधित असुन हे चारही बाधित राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आहेत.
१० जुलैल्या आढळलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील २१ वर्षीय युवक हा सिकंदराबाद येथून १ जुलैला आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात होता. इंदिरानगर चंद्रपूर येथील २१ वर्षीय महिला हैद्राबाद येथून १ जुलै रोजी परत आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात होती. दादमहाल वाडीतील २१ वर्षीय महिला ही जळगाव येथून आल्यानंतर २९ जून पासून संस्थात्मक अलगीकरणात होती. भानापेठ वॉर्ड मधील २९ वर्षीय युवक हैदराबादवरून परत आल्यानंतर एका खाजगी हॉटेलमध्ये संस्थात्मक अलगीकरणात होता. याशिवाय बिहार राज्यातील पाटणा शहरातून परत आलेल्या ४५ वर्षीय नागरिक परत आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात होता. वरोरा येथील सोमठाणा पोस्ट टेंभूर्णा येथील ३८ वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुष हे एकाच कुटुंबातील चार जण जालना येथे एका विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते. याच लग्न सोहळ्यात सहभागी भद्रावती शहरातील चारगांव कॉलनीतील २९ वर्षीय पुरुषही पॉझिटीव्ह आढळला तर वरोरा शहरातील २७ वर्षीय युवक मध्यप्रदेश मधून परत आल्यापासून गृह अलगीकरणात होता. बल्लारपूर शहरातील ७ वर्षीय मूलगा पॉझिटीव्ह ठरला आहे. या मुलांसह कुटुंबातील ५ सदस्य कारने मुंबईवरून परत आले होते. अन्य चार जण निगेटिव्ह ठरले आहे. मात्र मुलगा पॉझिटिव्ह ठरला आहे. आत्तापावेतोची बाधितांची आकडेवारी बघता बहुतेक बाधित हे बाहेरगावाहुन आलेले आहेत. संस्थात्मक किंवा गृह अलगीकरणातच ते राहिले आहेत. बाहेर गांवाहुन येणाऱ्यांनी ही बाब न लपविता शासनाला याची माहिती द्यावी. जिल्ह्यातील शंकुतला लॉन मध्ये तपासणी करून नंतरचं जिल्ह्यात प्रवेश करावा. आपल्यासोबतचं कुटूंब, शेजारी, नातेवाईक यांना स्वतःबद्दलची माहिती लपविल्यास भविष्यात त्याचा त्रास सहन करावा लागु शकतो, याबाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आज गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here