ऑक्सिमीटर च्या खरेदीत वाढ ! वापरण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम !

0
26

ऑक्सिमीटर च्या खरेदीत वाढ !
वापरण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम !

चंद्रपूर (वि. प्र.) : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येकजण आरोग्याची काळजी घेत आहे. दरम्यान, ऑक्सिमीटर घेण्याकडेही नागरिक वळले आहे. त्यामुळे नेमके ऑक्सिमीटर कसे वापरायचे याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
जिल्ह्यात सध्या रुग्णसंख्या नऊ हजारांवर पोहोचली आहे. मृत्यूसंख्याही सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आपल्या रक्तातील ऑक्सिजन प्रमाण मोजण्यासाठी ऑक्सिमीटरचा उपयोग होतो. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये फुफ्फुसाला संसर्ग झाल्याने श्‍वास घ्यायला त्रास होतो. शरीरातील ऑक्सिजन पातळीही खालावते. पल्स ऑक्सिमीटरमध्ये बोट ठेवल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची मात्रा मोजली जाते. त्याचप्रमाणे प्लसरेट अर्थात आपल्या हृदयाच्या ठोक्यांचे रीडिंगदेखील मिळते. कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिनची मात्रा तपासण्याचा सल्ला दिला जातो. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९0 टक्क्याहून जास्त असले पाहिजे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ऑक्सिजनची मात्रा ९0 पेक्षा खालावल्यास आणि बराच वेळ तशीच राहिल्यास त्वरित डॉक्टांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे. सध्या विविध किंमतीत ऑक्सिमीटर बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती ५00 रुपयांपासून २ हजार रुपयांपयर्ंत आहेत. कोणताही ऑक्सिमीटर घेताना कंपनी आणि उत्पादनाची विश्‍वासार्हता तपासून घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी न घाबरता सावध राहून कोरोनाशी लढा द्यावा, ऑक्सिमीटर सेंसरवर अवलंबून असते. त्यामुळे कधी कधी ऑक्सिजन लेवर कमी जास्त येऊ शकते. त्यामुळे न घाबरता पुन्हा तपासणी करावी.◼️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here