चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली; अरविंद साळवे पदभार स्वीकारणार

0
62

चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली; अरविंद साळवे पदभार स्वीकारणार

चंद्रपूर/ प्रतिनिधी
राज्यातील बहुचर्चित पोलीस बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे.आता चंद्रपूर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे हे पदभार स्वीकारणार करणार आहे. महेश्वर रेड्डी चंद्रपूर येण्यापूर्वी गङचिरोली येथे होते. जुलै 2018 पासून ते चंद्रपूरात कार्यरत होते. गेल्या महिनाभरापासून त्यांची बदली होणार असल्याची चर्चा होती मात्र तब्बल महिनाभरानंतर त्यांच्या बदलीचे आदेश आले आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या एकाचवेळी बदली होईल, असे भाकित वर्तविण्यात येत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी तिला आळा घालण्यात पोलीस अधीक्षक अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून बदली ही मागणी मागील महिन्यात केली होती. त्यांच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध दारुविक्री मोठ्या प्रमाणात वाढली.
चंद्रपुरात नव्याने दाखल होणारे
अरविंद साळवे हे भंडारा येथे कार्यरत आहेत. ते फेब्रुवारी 2019 रोजी भंडारा येथे रुजू झाले होते. अरविंद साळवे यांनी यापूर्वी अमरावती ग्रामीणचे उपपोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक, नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला आहे.
त्यांची आता चंद्रपूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे
राज्य सरकारने अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या सहा अधिकाऱ्यांच्या आणि अधीक्षक दर्जाच्या 22 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी (ता.१७) रात्री उशिरा जाहीर केले.◼️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here