चंद्रपूर S.T. डेपोत शुकशुकाट, पण वाहक-चालक मात्र कर्तव्यावर !

0
88

चंद्रपूर S.T. डेपोत शुकशुकाट, पण वाहक-चालक मात्र कर्तव्यावर !

चंद्रपूर,( १७ जुलै ) : चंद्रपूर शहरांमध्ये आज शुक्रवार दिनांक 17 जुलै पासून 21 तारखेपर्यंत कडक लाॅक-डाऊन पाळण्यात येणार आहे, या लाॅक-डाऊन चे पालन न करणाऱ्यांवर कडक शासन करण्यात येईल अश्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. चंद्रपूर एसटी डेपो मध्ये अशा सूचनांचे फलक लावण्यात आले असून आजपासुन चंद्रपूर डेपोमधून कोणत्याही बसेस सुटत नसल्यामुळे एस.टी. डेपोत शुकशुकाट आहे, परंतु वाहक आणि चालकांना कर्तव्यावर येण्याच्या सूचना बजावण्यात आले आहेत बसेस सुटणार नाही तर वाहक व चालकांना कर्तव्यावर बोलाविण्याचे कारण काय ते मात्र कळू शकले नाही. आमच्या प्रतिनिधीने काही अवधी पूर्वी चंद्रपूर बस डेपो ला भेट दिली असता त्या ठिकाणी काही चालक व वाहक उपस्थित होते, यासंबंधात यांना विचारणा केली असता ड्यूटीवर बोलाविण्याचे कारण त्यांना ही माहिती नसल्याचे त्यांनी सांगीतले. ST विभागाने यासंबंधात काय तो खुलासा करायला हवा.

◼️ एसटी वर्क शॉप मध्ये नियमांचा फज्जा !


चंद्रपूर शहरातील तुकुम रोडवर एसटी विभागाची वर्कशॉप आहे. या वर्कशॉप मध्ये नवशिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षणासाठी येण्याच्या सूचना विभागाकडून करण्यात आले असून नोकरीच्या अपेक्षेने हे युवक आपली हजेरी दर्शवीत आहेत परंतु एस.टी. वर्कशॉपकडून शासनाच्या नियमांचे खुलेआम उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसतआहे. दोन दिवसापूर्वी तोंडाला मास्क नाही, सॅनिटायझरची व्यवस्था नाही व सोशल डिस्टन्सीग चा खुले आम फज्जा उडविण्यात येत असल्याचे चित्र बघावयास मिळाले. कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी प्रशासन वेळोवेळी सूचना देत आहे, लाॅकडाऊन पाळण्याचे निर्देश देत आहे, शासनाच्या विविध संस्थांकडून, शासकीय विभागाकडून त्या नियमांचे उल्लंघन होत असेल तर त्याच्यावर ही कडक निर्बंध आणून त्यांना खंडीत करण्यात यावे, अशी मागणी आता होत आहे.◼️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here