चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 121 वर

0
9

ऊर्जाग्राम कुटुंबातील दोघे ;

चिमूर तालुक्यातून एक बाधित

आतापर्यत 62 कोरोनातून बरे ;

59 बाधितांवर उपचार सुरू

चंद्रपूर, दि.5 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील गेल्या 24 तासात कोवीड -19 संक्रमित तीन रुग्ण आढळून आल्याने आत्तापर्यंत कोवीड संक्रमित झालेल्या बाधितांची  संख्या 121 झाली आहे. यापूर्वीचे 62 बाधित रोग मुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या 59 बाधित उपचार घेत आहेत.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार ऊर्जा ग्राम येथील 35 वर्षीय महिला कर्मचारी यांचा काल घेतलेला स्वॅब पॉझिटीव्ह आला आहे. त्यापाठोपाठ त्यांचे 40 वर्षीय पती यांचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कुटुंबातील अन्य तिघांचा देखील स्वॅब घेण्यात आला आहे.

चिमूर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह पहिली घटना पुढे आली आहे. तालुक्‍यातील सोनेगाव येथील 35 वर्षीय नागरिक पॉझिटिव्ह आला आहे. नागपूर येथून आल्यानंतर 1 जुलैपासून संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या या नागरिकाचा स्वॅब 2 जुलै रोजी घेण्यात आला होता. या तीन नागरिकांमुळे रविवारी सायंकाळपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह संख्या 121 वर गेली आहे.

जिल्ह्यात सध्या एकूण 20 कंटेनमेंट घेऊन कार्यरत आहेत. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत आढळलेल्या पॉझिटिव्हमध्ये साऊथ आफ्रिका,कजाकिस्तान देशातून परतलेल्या या दोघांचा समावेश आहे. सर्वात जास्त बाधित हे मुंबईवरून परतले असून त्या पाठोपाठ हैदराबाद येथील 12 बाधितांचा समावेश आहे. मात्र यासोबतच सर्वाधिक धोका हा माहीती लपविणार्‍या नागरिकांचा असून त्यामुळे जिल्ह्यात संख्या वाढत आहे.

जिल्हा प्रशासनाने बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने तपासणी करणे व स्वतःच्या घरी जाण्याऐवजी कॉरेन्टाइन होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यामुळे कोरोनाचा जिल्ह्यात अधिक प्रसार होणार नाही. याची काळजी प्रत्येक कुटुंबाने घ्यावी. आपल्या आजूबाजूला बाहेरून येणाऱ्या नागरिकांची माहिती द्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे (एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित), 6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित), 9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून (एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून (एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण चार बाधित), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित), 27 जून (एकूण 7 बाधित), 28 जून (एकूण 6 बाधित), 29 जून (एकूण 8 बाधित), 30 जून (एक बाधित), 1 जूलै (एकूण दोन बाधित), 2 जूलै (एकूण दोन बाधित), 3 जूलै (एकूण 11 बाधित),4 जूलै (एकूण 5 बाधित), आणि 5 जूलै (एकूण 3 बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 121 झाले आहेत. आतापर्यत 62 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे  121 पैकी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता 59 आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here