हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात

0
20
हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात

नागपूर : आमदार आणि विधिमंडळ कर्मचाऱ्यांची संपूर्ण काळजी घेऊन विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात ७ डिसेंबरपासून सुरू होईल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

आमदार विकास ठाकरे यांनी करोनाचा वाढता संसर्ग आणि अपुऱ्या आरोग्य सुविधा या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन रद्द करावे. अधिवेशनासाठी लागणारा निधी करोनाच्या आरोग्य सुविधांसाठी करावा, अशी मागणी केली होती. त्यावर पटोले म्हणाले, नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान करोनापासून संरक्षण करण्यासाठी विधिमंडळात ‘निगेटिव्ह प्रेशर’ची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे विधिमंडळ सदस्यांचा करोनापासून बचाव होऊ शकतो. तसेच अधिवेशन काळात मोर्चा काढण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

जनतेला त्यांचे प्रश्न, समस्या सरकारसमोर मांडण्याची, सरकारचे लक्ष वेधून घेण्याची ही संधी असते. ती त्यांना दिली जाईल. मात्र, त्यांना करोनापासून बचाव करण्याचे नियम पाळावे लागतील. निगेटिव्ह प्रेशर ही संसर्ग नियंत्रणाची एक सामान्य पद्धत आहे. गोवर, क्षयरोग तसेच करोनासारख्या संसर्गजन्य आजारात रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.

निगेटिव्ह प्रेशर कक्षाला नकारात्मक दाब कक्ष असे म्हणतात. या खोलीत हवेचा दाब हा बाहेरील हवेच्या दाबापेक्षा कमी असतो. त्यामुळे त्या कक्षाचा दरवाजा उघडल्यानंतर बाहेरून येणारी दूषित हवा आणि इतर दूषित कण आत येत नाही, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.◼️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here