सुरक्षेअभावी अग्रणी भागातल्या बांबूच्या दोन इमारती भस्मसात !

0
30
सोमवारी तन्ज्ञांची चौकशी समिती होणार गठित !

चंद्रपूर (का.प्र.)
आशिया खंडातील सर्वात मोठी व देखणी बांबु इमारतीची गुरुवार दि. २५ फेब्रुवारी रोजी अग्रणी भागातल्या बांबूच्या दोन इमारतीची राखरांगोळी झाली. सुरक्षेच्या अभावी ही दुर्घटना घडल्याचे म्हटल्या जात आहे. याबाबत सविस्तर चौकशी केली जाईल आणि त्यासाठी एक आयएएस दर्जाचा अधिकारी व तांत्रिक तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करणार असल्याची घोषणाही वडेट्टीवार यांनी केली. या संदर्भात कुणीही दोषी आढळल्यास त्याला कठोर शिक्षा करू सोमवारी याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे मत पालकमंत्री विजय बडेट्टीवार यांनी व्यक्त केले. शुक्रवार दि. २७ रोजी त्यांनी चिचपल्ली येथील बांबु संशोधन इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांचेसोबत पत्रकारांची टिम होती. या दुर्घटनेत अंदाजे १५ ते २० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. आकर्षक व देखण्या असलेल्या दोन बांबुच्या इमारती या आगीत भस्मसात होणे ही चंद्रपूर जिल्ह्यासाठी दुर्भाग्याची बाब आहे. अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असती तर ही दुर्घटना टाळता आली असती. बीज प्रवाह सुरू नसल्यामुळे शॉर्टसर्किट ची शक्यता नाही. अग्निशमनासाठी जमिनीतून ठिकठिकाणी बाहिन्या दिसत आहेत पण त्यातून पाण्याची व्यवस्था नाहीच. बांबूपासून तयार करण्यात आलेल्या या दिमाखदार वास्तुच्या सुरक्षेसाठी अग्निशमन व्यवस्था सज्ज नसणे, या घोडचुकीला कधिही माफ केल्या जाऊ शकत नाही. जमिनीत पाणीसाठी असून ही या वास्तुला वाचविता न येणे ही गंभीर बाब आहे. दोषी अधिकाऱ्यांवर यासंबंधात कारवाई व्हायलाचं हवी. वनविभागाच्या फायर लाईनचे काम सुरू असल्याने ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग कशामुळे लागली हे आज ठामपणे सांगता येत नसले तरी चौकशीअंती ही बाब पुढे येणार आहे. तत्कालिन वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे हे ड्रिम प्रोजेक्ट होते. जिल्ह्यात दिमाखात उभ्या राहत असलेल्या या इमारतीचे येणाऱ्या काही दिवसांमध्ये उद्घाटन ही होणार होते. सध्या ही वास्तु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होते. त्याठिकाणी बांधकाम सुरू असल्याने प्रतिबंधीत परिसर म्हणून सा.बां. विभागाने तेथे एक फलक लावला होता. परंतु त्याच्या देखरेखीसाठी फक्त एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.
आसाम-सिंधुदुर्ग आणि कोलकत्ता भागातून आणलेल्या विशेष बांबूपासून तयार केलेल्या या इमारतींची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली होती. त्याचा अभ्यास करायला खास सिंगापूरहून चमू येथे भेट देऊन गेली अशा या आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या आणि देखण्या इमारतींचे अवध्या तासाभरात राखेत रूपांतर होते, हे दुर्दैवच. सुरुवातीला प्रकल्पाच्या छतावर लहानसे आगीचे लोळ आढळून आले. तेंव्हाच ती विझवता आली असती, पण तसे न झाल्याने आणि बांबू आणि त्यावर प्रक्रियेसाठी लावलेल्या लेपामुळे या
आगीने काही मिनिटांतच अवघ्या इमारतीला आपल्या कवेत घेतले. बाहेरची अग्निशमनाची वाहने आली, तोबर या दोन्ही इमारती जळून खाक झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here