रेती तस्करीचे हब’ असलेल्या ब्रम्हपूरीच्या रेती तस्करांना राजाश्रय !

0
74

चंद्रपूर जिल्ह्यात आज रेती तस्करी मोठ्या प्रमाणावर आपले डोके वर काढीत आहे. नदी-नाले पोखरून सुरू असलेल्या या रेती तस्करीला राजाश्रय प्राप्त असल्याने अनेक अपप्रवृत्तींनी यामध्ये प्रवेश केला आहे. जिल्ह्यातील अनेक रेती घाटाचे अद्याप लिलाव झालेले नाहीत. परंतु ते रेती घाट आपल्याच बापाचे समजून त्याठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर रेती तस्करी सुरू आहे. या रेती तस्करांना राजाश्रय प्राप्त असल्यामुळे अधिकारी सुद्धा याठिकाणी हस्तक्षेप करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे बघण्यात येते. जिल्ह्यातील ब्रम्हपूरी येथे हा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. महत्वाचे म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांचे हे विधानसभा क्षेत्र असून रेती तस्करांवर आळा बसविण्यात याठिकाणीचं अधिकारी वर्ग सपशेल फेल ठरत आहे.
अशीच एक घटना ब्रम्हपूरी येथे बुधवार दि.२ डिसेंबर रोजी घडली. अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकला अडवल्याच्या घटनेचा वचपा काढण्याच्या हेतूने बुधवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान शहरातील ब्रम्हपुरी-वडसा रोडवरील कुझा टी पॉइंटवर दोन चारचाकी वाहनांमध्ये १० चे वर गुंड प्रवृतीचे लोक अचानक आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. सदर गुंडगिरी करणान्यांमध्ये रेतीवाहतूक करणाऱ्या ट्रकचे चालक, मालक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच शहरातील काही युवकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने आलेल्या गुंडांनी तेथून काढता पाय घेतल्याने मोठा अनर्थ टळला. रेती तस्करीवर आळा बसविण्याची जबाबदारी असलेले प्रशासन दिवसा जागरूक दिसत असल्याने अवैध रेती वाहतूक करणारे ट्रक दिवसा कमी तर रात्री जास्त सक्रिय होतात. ११ सप्टेंबरला रात्री गीत पेट्रोलपंप समोर शहरातील काही युवकांनी अवैध रेती वाहतूक करणारा एक ट्रक पकडला व ट्रक चालकाला वाहन तहसील कार्यालयासमोर लावायला सांगण्या आले. दरम्यान, या घटनेची माहिती उपस्थित युवकांनी एका राजकीय पक्षाच्या तालुका अध्यक्षाला दिल्याने त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून ट्रकवर कारवाईकरिता संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मात्र कुणीही प्रतीसाद दिला नाही. शेवटी सदर तालुका अध्यक्ष एका महसूल अधिकाऱ्याच्या घरी बोलवायला निघून गेला. याचदरम्यान अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चालकाने काही युवकांनी ट्रक पकडल्याची माहिती ट्रकमालकाला दिली तेव्हा ट्रक मालक काही गुंड घेऊन घटनास्थळी आल्याने ट्रक पकडणारे युक्क घाबरून निघून गेले. या संधीचा फायदा घेऊन चालक रेतीने भरलेला ट्रक घेऊन तिथन पसार झाला. हे प्रकरण राजकीय पक्षाच्या त्या तालुका अध्यक्षाने घचून आणल्याचा राग रेतिघाटमालक व ट्रकचालकांना होता व ते त्यांच्या पाळतीवर होते. दरम्यान, बुधवार, २ डिसेंबरच्या रात्री ८ वाजता एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा व एक स्विफ्र गाडीमधून १० हून अधिक गुंड प्रवृतीचे लोक वडसा-ब्रम्हपुरी रोडवरील कुझा टी पॉइंटवर आले. प्रथम त्यांनी घटनेच्या दिवशी ११ सप्टेंबरला अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकचे फोटो काढणाऱ्या एका पत्रकाराला धमकावले. दरम्यान, काही गुंडप्रवृतीचे लोक पाळतीवर असल्याची माहिती होताच त्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षाने आपल्या जवळच्या लोकांना माहिती दिली व घटनास्थळी बोलावले. गावातील युवक दिसताच बाहेरून आलेले गुंड-प्रवृतीचे लोक निघून गेले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे, ही घटना ही ज्या कुझा टी पॉइंटवर घडली, त्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले असल्याने त्यामध्ये हा सर्व घटनाक्रम रेकॉर्ड झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधितांना याची योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करायला हवी अशी अपेक्षा येथील नागरिकांना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here