“लोकनेते” आ. मुनगंटीवार यांचा जन्मदिन जिल्ह्यांत विविध उपक्रमांनी झाला साजरा !

0
22

३० जुलै, हा माजी वित्तमंत्री लोकनेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या जन्मदिवसा जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमांनी साजरा झाला. देशावर आलेले कोरोनाचे संकट बघता या जन्मदिनाला “सेवादिन” म्हणून पार पाडणार असल्याचा निर्धार जिल्हा भाजपने केला होता. आज जिल्ह्यात शासकीय नियमांचे पालन करित अभिनव पद्धतीने जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालयात प्‍लाझ्मा डोनेशनच्‍या माध्‍यमातुन, रक्तदानाच्या माध्यमातून, निशुल्क कोविड अॅटीजन तपासणी, वृक्षारोपण व वृक्ष संगोपन, रक्तदान शिबिर, तसेच चंद्रपूर महानगरातील 1000 प्रतिष्ठानाला सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या कार्याचे माहिती पुस्तिका व सुरक्षा किट, वाहतूक पोलिसांना सुरक्षा किट तथा आर्सेनिक गोळ्या तसेच फेस शिल्डचे वितरण, जननी सुरक्षा योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री मातृत्व योजना, अटल पेंशन योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, डिजीटल इंडिया, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जनऔषधी योजना आदी योजनांची माहिती गरजूंना पुरवून चंद्रपुर जिल्हा भाजपने लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. तसेच आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा जन्‍मदिवस सेवा दिन तसेच चालू वर्ष सेवा वर्ष म्‍हणून साजरे करण्‍याचा संकल्‍प जिल्हा भाजपने केला आहे.

लोकसेवेच्‍या मार्गावर चालत भाजपा व जनता यांचे नाते अधिक दृढ करणार – डॉ. मंगेश गुलवाडे
लोकनेते आ. मुनगंटीवार यांनी दाखविलेला लोकसेवेच्‍या मार्गावर चालत त्‍या माध्‍यमातुन भाजपा आणि जनता यांचे नाते अधिक दृढ करण्‍याचा प्रयत्‍न करणार असल्‍याचे प्रतिपादन भाजपा चंद्रपूर महानगर (जिल्‍हा) अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले.
दिनांक 30 जुलै रोजी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या जन्‍मदिनाचे औचित्‍य साधुन जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालय चंद्रपूर येथे प्‍लाझ्मा डोनेशन शिबीराचे आयोजन करण्‍यात आले. या शिबीराचे उदघाटन चंद्रपूरच्‍या महापौर सौ. राखी कंचर्लावार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी भाजपा चंद्रपूर महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा नेते प्रकाश धारडे, डॉ. अनंत हजारे, यश बांगडे यांची यावेळी प्रामुख्‍याने उपस्थिती होती. या प्‍लाझ्मा डोनेशन प्रक्रियेसाठी 24 तासात केंद्र सरकारकडून परवानगी प्राप्‍त करणारे अन्‍न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्‍त डॉ. डांगे यांचा सत्‍कार यावेळी करण्‍यात आला. श्री. संतोष जेठवानी यांनी यावेळी प्‍लाझ्मा डोनेशन केले. त्‍यांचेही यावेळी स्‍वागत करण्‍यात आले. डॉ. मंगेश गुलवाडे यांनी डॉ. डांगे आणि श्री. संतोष जेठवानी यांचे आभार मानले. प्‍लाझ्मा डोनेशनच्‍या माध्‍यमातुन लोकनेते आ. सुधीर मुनगंटीवार यांना जन्‍मदिनाच्‍या शुभेच्‍छा देण्‍याच्‍या या उपक्रमाचे सामान्‍य रूग्‍णालय परिसरात कौतुक करण्‍यात येत होते.
विवेकानंद नगर परिसरात वृक्षारोपण !
विवेकानंद नगर परिसरातील खुल्‍या गार्डनमध्‍ये गाडगेबाबा कृती समितीच्‍या माध्‍यमातुन वृक्षारोपण करत आ. मुनगंटीवार यांना जन्‍मदिनाच्‍या शुभेच्‍छा देण्‍यात आल्‍या.
मातोश्री सभागृह येथे रक्‍तदान शिबीर!
तुकूम परिसरातील मातोश्री सभागृह येथे रक्‍तदान शिबीराचे आयोजन नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्‍या पुढाकराने करण्‍यात आले. रक्‍तदानाच्‍या माध्‍यमातुन आ. सुधीर मुनगंटीवार यांना जन्‍मदिनाच्‍या शुभेच्‍छा देण्‍यात आल्‍या.
अष्‍टभुजा वार्ड तसेच ओमनगर महाकाली वार्ड परिसरात संजय गांधी निराधार योजना व अन्‍य योजनांबाबत शिबीर!
अष्‍टभुजा वार्ड परिसरात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या सामाजिक अर्थसहाय्याच्‍या योजनांबाबत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्‍यात आले. त्‍याचप्रमाणे  जनधन खाते उघडण्‍याबाबत व नागरिकांना रेशनकार्ड उपलब्‍ध करण्‍याबाबत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्‍यात आले. या शिबीरात संबंधित अधिका-यांना, बँक प्रतिनिधींना आमंत्रीत करण्‍यात आले. नागरिकांना रेशनकार्डचे वितरण सुध्‍दा करण्‍यात आले.
बाबुपेठ परिसरात हनुमान मंदीरात प्राणप्रतिष्‍ठा कार्यक्रम!
शहरातील बाबुपेठ परिसरातील हनुमान मंदीरात प्राणप्रतिष्‍ठा कार्यक्रम संपन्‍न झाला. पुजाअर्चा, अभिषेक आदींच्‍या माध्‍यमातुन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या दिर्घायुष्‍यासाठी प्रार्थना करण्‍यात आली.

लोकनेते सुधीरभाऊ हेच खरे विकासपुरुष-देवराव भोंगळे
सुधीरभाऊंचे घुग्गुस शहरावर विशेष प्रेम राहिले आहे, त्यांच्या माध्यमातून घूघूसचा सर्वांगीण विकास झाला आहे. शहरात 10 गार्डन, तीन पाण्याच्या टाक्या, प्रत्येक इलेक्ट्रिक पोलवर LED लाईट, प्रत्येक चौकात हाई मास्ट लाईट, शहरात सिमेंट रोड, नाली, प्रत्येक एरियात बोरिंग अशा अनेक गोष्टी आम्ही करू शकलो. गोरगरिबांची मदत करणारे सुधीर भाऊ खऱ्याअर्थाने विकास पुरुष आहेत. माता महांकाली त्यांना उदंड आयुष्य देवो, असे मत यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले.
घुग्घुस येथे सुद्धा विविध उपक्रमाद्वारे सुधीरभाऊंचा वाढदिवस साजरा करण्यात आला. घुग्गुस शहरात लोकाभिमुख विविध उपक्रम घेण्यात आले. यात प्रामुख्याने मोफत जन-धन खाते उघडने तसेच पासबुक वाटप, निराधार योजना शिबिर, नवीन शिधापत्रीका वाटप, गुणवंत विद्यार्थी सत्कार, गोरगरिबांना व विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या नागरिकांना धान्यकिटचे वाटप करण्यात आले.
या दिवसाचे औचित्य साधून मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वतीने घुघुस ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दोन नवीन ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन देण्यात आल्या. या मशीनचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. नागरिकांना शुद्ध पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी नवीन दोन आरो मशीनचे भूमिपूजन बहादे लेआऊट व केमिकल नगर येथे देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी घुग्गुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, जि. प. सभापती नितुताई चौधरी, प.स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, सरपंच संतोष नुने, विनोद चौधरी, ग्रामपंचायत सदस्य संजय तिवारी, राजकुमार गोडसेलवार, प्रकाश बोबडे, साजन गोहने, सिनु इसारप, पूजा दुर्गम, कुसुमताई सातपुते, नंदाताई कांबळे, सुषमा सावे, तंटामुक्तीचे अध्यक्ष हसन शेख, हेमंत उरकुडे, बबलू सातपुते, मल्लेश बल्ला, पंकज रामटेके, अनिल मंत्रीवार, अनंता बाहदे, इम्तियाज अहमद, अमोल थेरे, संजय भोंगळे, प्रवीण सोदारी, सुरेश खडसे, प्रशांत चरडे, आतिश मेळावार, सुनील सिंह, सुरेंद्र भोंगळे विनोद जांजरला, नितीन काळे, शरद गेडाम, स्वप्नील इंगोले, श्रीकांत सावे, गुरुदास ताग्रपवार, मुकेश कामतवार, अजगर खान, संकेत बोढे, राजू चतकी, अतुल चोखांद्रे, विकास बरसागडे, रवी चूने, कोमल ठाकरे संचालन वैशाली ढवस तर आभार प्रदर्शन सुचिता लुटे यांनी केले आहे.
गडचांदूरात अन्नधान्याचे किट वाटप !
गडचांदूर शहर भाजपच्या वतीने गडचांदुर शहरात सध्या कडक संचारबंदी लागू असून येथील प्रभाग क्रमांक 7 हा गेल्या 11 दिवसांपासून प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आले आहे.सदर क्षेत्रात बरेचशे रहिवासी हे रोजमजूरी करणारे असून मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्थानिक नगरपरिषदेच्या परवानगीने भाजपाचे शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार,नगरसेवक रामसेवक मोरे व अरविंद डोहे यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते येथील गरजूंना धान्य कीटचे वाटप केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here