आज 7 बाधित, जिल्ह्यात 403!

0
62

चंद्रपूर दि. २४ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची शनिवारची ३९६ संख्या रविवारी सायंकाळपर्यंत ४०३ वर पोहोचली आहे.
जिल्हयात कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २४८ झाली असून गेल्या चोवीस तासात आज २८ बाधितांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये सध्या १५५ बाधितावर उपचार सुरू आहे.
जिल्ह्याचा डब्लिंग रेट सध्या १५.३ आहे. आतापर्यंत चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये १०२ रुग्ण आढळून आले आहे. तर जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, राजुरा, भद्रावती,ब्रह्मपुरी, कोरपना, नागभिड, गडचांदूर या शहरांमध्ये १४० रूग्ण आढळून आलेले आहे. ग्रामीण भागात ही रुग्णसंख्या १५७ आहे.
रविवारी सकाळपासून पुढे आलेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहरातील बापुजी नगर, बालाजी वार्ड, येथील ३० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. हा कुंटुबातील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातून पुढे आला आहे.
मुल येथील राईस मिल मधील बिहार मधून आलेल्या कामगारांचे पॉझिटिव्ह अहवाल पुढे येणे सुरूच आहे. रविवारी राईस मिल मधील बिहार येथील चार नागरिकांसह यांना वैद्यकीय सोयी सुविधा पुरविणाऱ्या 37 वर्षीय कर्मचारी देखील संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे. एकूण ५ नागरिक पॉझिटिव्ह ठरले आहे.
राज्य राखीव दलाच्या पोलीस कंपनीतील आज पुन्हा एका जवानाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ३३ वर्षीय पोलीस जवानाचा अहवाल आज पॉझिटिव्ह असून आतापर्यंत ३१ जवान पॉझिटीव्ह ठरले आहे.
मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील नवेगाव येथील रहिवासी असणारा एक २६ वर्षीय कामगार पॉझिटिव्ह ठरला आहे. सिकंदराबाद येथून रेल्वेने या कामगाराने प्रवास केला होता. सावली येथे संस्थात्मक अलगीकरणात असताना या कामगारांचा स्वॅब घेण्यात आला तो पॉझिटिव्ह ठरला आहे.
जटपुरा गेट येथे फुलांचा व्यवसाय करणाऱ्या, 28 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या युवकाचा संपर्क शहरातील अन्य एका पॉझिटिव्हशी आला होता.चंद्रपूर दि. २४ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची शनिवारची ३९६ संख्या रविवारी सायंकाळपर्यंत ४०३ वर पोहोचली आहे.
जिल्हयात कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २४८ झाली असून गेल्या चोवीस तासात आज २८ बाधितांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये सध्या १५५ बाधितावर उपचार सुरू आहे.
जिल्ह्याचा डब्लिंग रेट सध्या १५.३ आहे. आतापर्यंत चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये १०२ रुग्ण आढळून आले आहे. तर जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, राजुरा, भद्रावती,ब्रह्मपुरी, कोरपना, नागभिड, गडचांदूर या शहरांमध्ये १४० रूग्ण आढळून आलेले आहे. ग्रामीण भागात ही रुग्णसंख्या १५७ आहे.
रविवारी सकाळपासून पुढे आलेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहरातील बापुजी नगर, बालाजी वार्ड, येथील ३० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. हा कुंटुबातील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातून पुढे आला आहे.
मुल येथील राईस मिल मधील बिहार मधून आलेल्या कामगारांचे पॉझिटिव्ह अहवाल पुढे येणे सुरूच आहे. रविवारी राईस मिल मधील बिहार येथील चार नागरिकांसह यांना वैद्यकीय सोयी सुविधा पुरविणाऱ्या 37 वर्षीय कर्मचारी देखील संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे. एकूण ५ नागरिक पॉझिटिव्ह ठरले आहे.
राज्य राखीव दलाच्या पोलीस कंपनीतील आज पुन्हा एका जवानाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ३३ वर्षीय पोलीस जवानाचा अहवाल आज पॉझिटिव्ह असून आतापर्यंत ३१ जवान पॉझिटीव्ह ठरले आहे.
मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील नवेगाव येथील रहिवासी असणारा एक २६ वर्षीय कामगार पॉझिटिव्ह ठरला आहे. सिकंदराबाद येथून रेल्वेने या कामगाराने प्रवास केला होता. सावली येथे संस्थात्मक अलगीकरणात असताना या कामगारांचा स्वॅब घेण्यात आला तो पॉझिटिव्ह ठरला आहे.
जटपुरा गेट येथे फुलांचा व्यवसाय करणाऱ्या, 28 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या युवकाचा संपर्क शहरातील अन्य एका पॉझिटिव्हशी आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here