Home Latest News किंगमेकर गरपल्लिवार भाजपात; काँग्रेसला सोचिठ्ठी

किंगमेकर गरपल्लिवार भाजपात; काँग्रेसला सोचिठ्ठी

0
किंगमेकर गरपल्लिवार भाजपात; काँग्रेसला सोचिठ्ठी

 

गोंडपिपरी / दीपक वांढरे

स्थानिक राजकारणात खेमचंद गरपल्लीवार हे मोठं नाव. आपल्या राजकीय खेळीन गरपल्लिवार यांनी अनेकदा मोठ्या पक्षांना धक्का दिला होता. काँग्रेसच्या congres सोबत असलेले गरपल्लीवार दांपत्याने भाजपात bjp प्रवेश केला आहे.काही दिवसापासून नगरपंचायतेत सत्ताबदलाच्या चर्चा रंगू लागल्या.अश्यात गरपल्लीवार यांच्या प्रवेशाने सत्तांतराच्या चर्चांना अधिक पेव फुठला आहे.

काँग्रेसची सत्ता येवून एक वर्ष झालं आहे.अश्यात काही दिवसापासून नगरपंचायतेत सत्ता बदलाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. गोंडपिपरी gondpipri नगरपंचायतीत सात काँग्रेस,चार भाजप,दोन शिवसेना,दोन राष्ट्रवादी, दोन अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे.अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सौ.गरपल्लिवार या काँग्रेसच्या बाजूने उभ्या झाल्या होत्या. सत्तांतर बदलांच्या चर्चा सुरू असतानाच नगरसेविका शारदा गरपल्लिवार,त्यांचे पत्ती खेमचंद गरपल्लीवार यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. गरपल्लिवार हे चानाक्ष राजकारणी म्हणून ओळखले जातात. आपल्या राजकीय खेळीनं मोठ्या पक्षांना त्यांनी अनेकदा हादरे दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशाने नगरपंचायतीच्या सत्ताबदल्याचे वारे अधिक वेगाने वाहू लागल्याची चर्चा आहेत.येणाऱ्या दिवसात गरपल्लिवार काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here