Home चंद्रपूर राजुरा इन्फंट कॉन्व्हेंट येथे संविधान दिन व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन

इन्फंट कॉन्व्हेंट येथे संविधान दिन व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन

0
इन्फंट कॉन्व्हेंट येथे संविधान दिन व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन

 

राजुरा

इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे संविधान दिन व वेषभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचून करण्यात आले. तसेच इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी भारताचे थोर महापुरुष, समाजसुधारक यांच्या वेशभूषा सादर करून महापुरुषांच्या विचारांचे स्मरण केले. या स्पर्धेचे परीक्षण दिपक खाडे, राम मेडपल्लीवार, अश्विनी फासला या शिक्षकांनी केले.
या प्रसंगी कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सुशिलकूमार वासेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here