Thursday, March 16, 2023
Homeचंद्रपूरसावलीउपजतबाळ मृत्यूप्रकरणी चौकशी करुण दोषीवर कार्यवाही करा ; विजय कोरेवार

उपजतबाळ मृत्यूप्रकरणी चौकशी करुण दोषीवर कार्यवाही करा ; विजय कोरेवार

तालुका आरोग्य विभागाला चौकशीच्या केल्या सूचना ;
उपकेन्द्रातिल कर्तव्यावर असना ऱ्या कर्मचा ऱ्याचे दुर्लक्ष ;
पांढरसराड़ येथील उपजतबाळमृत्यु प्रकरण

सावली

पेढ़रीमक्तता उपकेन्द्रातील कर्तव्यावर असना ऱ्या कर्मचा ऱ्याच्या बेजबाबदार पनामुळे एका मातेला आपल बाळ गमवाव लागल शिल्पा मोरेश्वर गावडे असे पीढित मातेचे नाव असून ती पांढरसराड येथील रहिवाशी होती या संदर्भाची गंभीर दखल घेत पीढित मातेशी संपर्क करुण सावली पंच्यायत समितीचे सभापति विजय कोरेवार यानी सदर प्रकरणी तपास करुन संबंधितावर कार्यवाही करण्यात यावी याबाबत सावली तालुका आरोग्य विभागाकडे सुचना केली आहे मिळालेल्या माहिती नुसार तालुक्यातील जवळच असलेल्या आणि पाथरी आरोग्य केंद्रा अंतर्गत येत असलेल्या पेढ़रीमक्तता येथे आरोग्य वर्धिनी केंद्र प्रा . आ .उपकेंद्र (पेढ़री मक्तता ) या उपकेंद्राची निर्मिति करण्यात आली १२५० लोकवस्तिच्या गावात सुरु असलेल्या या उप केंद्रा अंतर्गत पेढ़री मक्तता ; पांढरसराङ ; मानकापुर ;मेंटेगाव ; चक ; सायमारा ; मुड़ाळा आदि गावात आरोग्य सेवा पुरविली जाते १ आरोग्य समुदाय अधिकारी ; २ आरोग्य सेविका ; १ आरोग्य सेवक अश्या चार कर्मचा ऱ्याच्या भरोश्यावर सात गावच्या लोकांच्या आरोग्या ची भिस्त आहे मात्र येथील कर्मचारी वेळेवर हज़र राहत नाही असले तर ते बेजबाबदार पनाने वागतात असे या भागातील नागरिकांकडून बोलले जात आहे
पेंढरी मक्ता उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वृत्तीमुळे पांढरसराड येथील नवजात बाळाचा मृत्यू झाला होता. याबाबत सभापती विजय कोरेवार यांनी पिढीत महिलेची भेट घेऊन आरोग्य विभागाकडे चौकशीची मागणी केली. त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
पेंढरी मक्ता उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या पांढरसराड येथील गर्भवती महिला शिल्पा मोरेश्वर गावडे ही पोटात दुखत असल्याने उपकेंद्र पेंढरी मक्ता येथे प्रसुतिकरिता भरती झाली. त्यावेळेस परीचालिका नागभीडकर कार्यरत होत्या. त्यांनी लगेच रेफरचा सल्ला दिला. मात्र गाडीत बसत्यावेळी गर्भातून बाळाचे पाय बाहेर आल्यावरही नागभीडकर परीचालकेने माझ्याने जमत नाही म्हणत याकडे दुर्लक्ष केले. तिथून निघून सावलीच्या दिशेने जात असतानाच वाटेतच प्रसूती झाली मात्र बाळ मृत होते. उपकेंद्र येथेच लक्ष दिले असते तर उपजत मृत्यू झाला नसता असा आरोप पिढीत महिलेकडून होत आहे. सदर प्रकरणाची माहिती पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांना माहिती होताच पीडित महिलेची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली व तालुका आरोग्य अधिकारी यांना चौकशी करण्याचे सूचना दिले. यावरून तालुका आरोग्य अधिकारी यांनी वैद्यकीय अधिकारी पाथरी यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश दिले आहे तेव्हा आरोग्य विभागाची दोषिवर काय कार्यवाही होते याकडे सर्वाचे लक्ष लागले असले तरी सुदृढ़ आणि शसक्त बलशाली राष्ट्राच्या निर्मिति साठी गर्भवती माता स्तनपान माता उपजतबाळ आदि साठी शासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक सुविधा निर्माण केल्या असल्या तरी या सुविधाचा वापर अधिकारी कर्मचारी यांच्या कडून ग्रामीण भागातील जनतेला योग्य रित्या पुरविल्या जात नाही कर्मचा ऱ्याचे सहकार्य मिळत नाही परिणामी मातेला आपले बाळ गमविन्याची पाळी येते …….

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments