गोंडपिपरी
कुटूंबाची आर्थिक स्थिती उंचविण्यात महीलांचा वाटा मोठा असतो.ग्रामीण भागातील महीलांचा आर्थिकस्तर उंचविण्यासाठी राष्ट्रीय उद्योग इंडीयाने पुढाकार घेतला आहे.स्वयंरोजगार राष्ट्रीय महाप्रकल्प अंतर्गत महीलांना विविध उद्योगांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा येथे नुकतेच प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन जिल्हा समन्वयक मनीषा सपाट यांच्या हस्ते पार पडले.या प्रशिक्षण केंद्रातून शिवम क्लास, अगरबत्ती ,मेनबत्ती,संगित क्लास, कराटे क्लास,संगणक प्रशिक्षण,शेळी पालन आदींचे प्रशिक्षण महीलांना दिले जाणार आहे.धाबा येथिल विठ्ठल चनकापुरे यांनी प्रशिक्षण केंद्र सूरू आहे.यावेळी तालुका समन्वयक कुंदा खासरे,वैशाली मुंजनकर,अरूण बोरकर,रूपेश भगत उपस्थित होते.या प्रशिक्षण केंद्राचा महीलांनी आवर्जून लाभ घ्यावा असे आव्हान मनिषा सापट यांनी केले आहे.