Home चंद्रपूर गायत्री शक्‍तीपिठाचे काम भारतात सर्वोत्‍तम ;आ. सुधीर मुनगंटीवार

गायत्री शक्‍तीपिठाचे काम भारतात सर्वोत्‍तम ;आ. सुधीर मुनगंटीवार

0

तुकूम येथे आचार्य श्रीरामस्‍मृती उपवन, हायमास्‍ट लाईट व राममंदीर शेडचा लोकार्पण समारंभ

चंद्रपूर

देशात अनेक संस्‍था आध्‍यात्‍मीक क्षेत्रात काम करीत आहेत. त्‍यामध्‍ये गायत्री शक्‍तीपिठाचे काम हे सर्वोत्‍तम आहे. कारण अध्‍यात्‍मीक उन्‍नती बरोबरच सामाजिक जाणीव ठेवून ही संस्‍था काम करते, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. हनुमान नगर, अयप्‍पा मंदीर रोड तुकूम येथे आचार्य श्रीरामस्‍मृती उपवन, हायमास्‍ट लाईट व राममंदीर शेडचा लोकार्पण समारंभ कार्यक्रमात बोलताना आ. मुनगंटीवार यांनी वरील प्रतिपादन केले. याप्रसंगी देवसंस्‍कृती विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. चिन्‍मय पंडया यांची प्रमुख उपस्थिती होती. कुठल्‍याही प्रकल्‍पाची सुरूवात ही चांगली होते, परंतु त्‍यानंतर तेथील देखभाल ही सुध्‍दा चांगली व्‍हायला पाहीजे व येथील सुजाण नागरिक ही जबाबदारी पार पाडतील अशी मला खात्री आहे, असेही याप्रसंगी आ. मुनगंटीवार म्‍हणाले.

देशात आचार्य श्रीरामजी यांच्या नावाचे उपवन पहिल्‍यांदाच चंद्रपूर येथे झाले. हा आमच्‍यासाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे असे या प्रसंगी बोलताना डॉ. चिन्‍मय पंडया म्‍हणाले. आ. सुधीर मुनगंटीवार यांचे सामाजिक कार्य खुप मोठे आहे. तसेच वनमंत्री म्‍हणून त्‍यांनी वनक्षेत्रात केलेली कामे ही वाखाणणीय आहेत. असे लोकप्रतिनिधी लाभणे हे त्‍या क्षेत्रातील जनतेसाठी भाग्‍याचे असते, असेही डॉ. पंडया पुढे म्‍हणाले. या कार्यक्रमाला यशस्‍वी करण्‍यासाठी भाजपाचे महानगर जिल्‍हा सरचिटणीस तथा त्‍या विभागाचे नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी प्रचंड मेहनत घेतली. या कार्यक्रमाला भाजपाचे ग्रामीण जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महानगर सरचिटणीस ब्रिजभूषण पाझारे, जिल्‍हा सरचिटणीस नामदेव डाहूले, उपमहापौर राहूल पावडे, विजय चिताडे, बबनराव अनमुलवार, प्रज्ञा बोरगमवार, सुधाकर बोंडे, हरीचंद्र भाकरे, मंजुश्री कासनगोट्टूवार, जे.के. सिंग, आमीन शेख, प्रा. राठोड, सातपुते ताई, आकाश म्‍हस्‍के, प्रविण उरकुडे, बंडू गौरकार, पुरूषोत्‍तम सहारे, धर्माजी खंगार, आशिष बोंडे, डॉ. मध्‍यासवार प्रामुख्‍याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here