चंद्रपूर
अँकर ; जिल्ह्यात वाघ-मानव संघर्षाने टोक गाठले.वर्षाचा शेवटचा दिवशीही वाघाने ओरबडे दिले.गावाकडे निघालेल्या युवकावर झडप घालून ठार केल्याची घटना जिल्ह्यातील मुल तालुक्यात घडली.भारत रामदास कोवे असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहीतीनुसार , ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मुल तालुक्यात येणाऱ्या डोणी गावातील भारत रामदास कोवे ( वय 23 ) कामानिमीत्य बाहेरगावी गेले होते.काम आटोपून फुलझरी मार्गे गावाकडे निघाले. याच दरम्यान वाघाने हल्लाकरून जागीच ठार केले.ही घटना मूल बफर क्षेत्रातील करवण येथील कक्ष क्रं. 351 मध्ये घडली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.पुढील तपास सूरू आहे.