नागगभीड (शिवनगर) येथिल घटना
नागभीड
नागभीड येथील ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे येथील एका बाळंतीण महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.या मृत्यू प्रकरणाची चौकशी व दोषींवर कारवाई करण्यात यावी मागणीसाठी या महिलेचा मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचे चौकशीची हमी दिल्यानंतर मृतदेह अचलण्यात आला.
सारिका संजय तांदूळकर (३०) असे या महिलेचे नाव आहे.सदर महिला दिवस पूर्ण झाल्याने येथील ग्रामीण रूग्णालयात भरती झाली.तत्पूर्वी या महिलेची नियमित तपासणी ब्रम्हपुरी येथील एका प्रसुती तज्ञाकडे सुरू होती.सदर प्रसुती तज्ञ नागभीड येथील ग्रामीण रूग्णालयात सेवा देत आहे, अशी माहिती आहे.या तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ही महिला येथील ग्रामीण रूग्णालयात भरती झाल्याचे समजते.
भरती झाल्यानंतर गुरूवारी तिचे प्रसुती करण्यात आली.त्यात मुलगी जन्मास आली.मात्र प्रसुतीनंतर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला.दरम्यान ग्रामीण रूग्णालयातील प्रसुती तज्ञाने गडचिरोली येथे हलविण्याचा सल्ला दिला.या सल्ल्यानुसार अॉक्सीजन लावून गडचिरोली येथे नेण्यात आले.मात्र महिलेची एकंदर स्थिती लक्षात घेऊन गडचिरोलीच्या डॉक्टरांनी भरती करण्यास नकार देऊन चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.या महिलेला गडचिरोली येथून पुन्हा चंद्रपूर येथे नेत असतांना मूलजवळ अॉक्सिजन संपले.धावपळ करून अॉक्सिजन मिळविण्याचा प्रयत्न केला.अॉक्सिजन मिळवण्यात दीड तासाचा वेळ गेला.नंतर चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.दरम्यान या घटनेने शहरात शहरात चांगलाच संताप निर्माण झाला.आणि काही लोकांचा जमाव ग्रामीण रूग्णालयात गोळा झाला.या जमावाकडून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.दरम्यान शुक्रवारी दीड वाजता महिलेचे शवविच्छेदनानंतर मृतदेह सरळ नागभीड येथील ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला.यावेळी ग्रामीण रूग्णालयात अतिशय तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.पोलीसही दाखल झाले.दरम्यान चंद्रपूर येथील अधिकारीही दाखल झाले आणि याप्रकरणी चौकशी नेमण्यात येईल व विनाविलंब चौकशी करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.