१ ते ५ वयोगटात वाढले संसर्गाचे प्रमाण !
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहेत. देशात आता दररोज कोरोना रुग्णसंख्येचा आकडा २ लाखाच्या पार जात असल्याचे चित्र आहे. अशात आता डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार, कोरोनाच्या दुस?्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे. विशेषत: १ ते ५ या वयोगटातील लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक होत असल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असल्याचे म्हणत बालरोग तज्ज्ञांनी म्हटले, की नवजात आणि तरुणांमध्ये कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव आढळून येत आहे.
सर गंगा राम हॉस्पिटलचे बालरोग चिकित्सक डॉक्टर धीरन गुप्ता म्हणाले, की २0२0 च्या तुलनेत रुग्णालयात दाखल होणार्या लहान बाळांच्या संख्येत पाच पटीने वाढ झाली आहे. यावेळी अनेक लहान किंवा नवजात बाळ कोरोनाच्या विळख्यात आल्याचे चित्र आहे, असे एलएनजेपी रुग्णालयातील आपात्कालीन विभागाच्या प्रमुख डॉक्टर रितू सक्सेना यांनी सांगितले. सक्सेना यांनी सांगितले, की कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून ७ ते ८ बालकं रुग्णालयात अँडमिट झाले. याशिवाय १५ ते ३0 या वयोगटातील तरुणांमध्येही यावेळी कोरोनाचा प्रसार अधिक आहे, असेही त्यांनी सांगितले.
गुजरातमधील सूरतमध्ये गेल्या आठवड्यात एका १५ दिवसांच्या अर्भकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या देशभरात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असताना त्यामध्ये १५ दिवसांच्या बालकापासून ते १५ वर्षांच्या मुलांपयर्ंत सर्वांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. मार्च ते एप्रिल दरम्यान आतापयर्ंत तब्बल ८0 हजार मुलांना कोरोनाची लागण झालेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आणि दिल्ली या राज्यांमध्ये ७९, ६८८ लहान मुले कोरोना संक्रमित झालेले आहेत. महाराष्ट्र : १ मार्च ते ४ एप्रिल ६0 हजार ६८४ मुले कोरोनाबाधित झालेले आहेत. त्यामध्ये ९ हजार ८८२ मुले ही ५ वर्षांच्या आतील आहेत. छत्तीसगड : महाराष्ट्रानंतर सर्वाधिक ५९४0 लहान मुले कोरोना संक्रमित झालेले आहेत. त्यामध्ये ९२२ मुले ही खूपच छोटी आहेत. उत्तर प्रदेश : ३00४ लहान मुले कोरोना संक्रमित आहेत. त्यात ४७१ मुले ही ५ वर्षांच्या आतील आहेत, अशी माहिती आहे. कर्नाटक : ७३२७ लहान मुले ही कर्नाटक राज्यात कोरोना संक्रमित झालेले आहेत. त्यात ८७१ लहान मुले आहेत. दिल्ली देशाच्या राजधानीत ४ एप्रिलपयर्ंत २७३३ लहान मुले ही कोरोनाबाधित आहेत. त्यामध्ये ४४१ मुले ही ५ वर्षांच्या आतील आहेत. कोरोनाच्या दुसर्या लाटेत आता लहान मुलांचा बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहेत. वयस्कर लोकांच्या शरीरात कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी ज्या एण्टीबॉडीज आढळत होत्या, त्याच एण्टीबॉडीज ५२ टक्के मुलांच्या शरीरात सापडलेल्या आहेत. १५ ते २३ जानेवारीपयर्ंत कोरोनाबाधितांमध्ये ५ ते १२ वर्षांची मुले कोरोनाबाधित झालेली होती.