मनसेने उपस्थित केली शंका !
मुंबई : प्रसारमाध्यमेही कोरोनाची आकडेवारी तपासून पाहत नाही. सरकारडून आलेली आकडेवारी देतात. आता अधिवेशन काळामध्ये मोर्चे घेऊन अनेकजण सरकारकडे आपली मागणी मांडतात. मात्र राजकीय मोर्चांवर बंदी घालून आम्हाला प्रश्न विचारायचे नाही अशी सरकारची भूमिका आहे, अशी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. केवळ अधिवेशन टाळण्यासाठी कोरोना वाढल्याची आकडेवारी दाखवली जात आहे असा आरोपही देशपांडेंनी केलाय. तसेच मुख्यमंत्री जनतेच्या प्रश्नांवर बोलत नाहीत असा आरोपही देशपांडेंनेही केला आहे. अधिवेशन टाळण्यासाठी ठाकरे कोरोनाचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत का?, अशा प्रश्न देशपांडेंनी विचारला आहे.
वीज बिलांवर एवढं आंदोलन सुरू आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कधी लाईव्ह केले नाही. ते त्या प्रश्नावर का बोलत नाहीत. का लोकांच्या नोकर्यांबद्दल बोलत नाही. तुम्ही नीती आयोगाला सांगता कार्यालयीन वेळा बदला तुम्ही मंत्रालयाच्या वेळा का नाही बदलत. वर तुम्ही लोकांना सांगता मी काय बोलतो तुम्हाला ऐकू येत आहे पण तुम्ही काय बोलता मला ऐकू येत नाही. हे काय चालवलं आहे? ही कुठल्या पद्धतीची लोकशाही आहे? लोकांना घरात डांबायचे. त्याच्या नोकरीचा विचार करायचा नाही. बँका त्यांच्याकडून हफ्ते वसूल करतायत. लोकांना त्यांच सोनं नाणं गहाण ठेवले आहे, त्यांच्या नोकर्या गेल्यात, त्यांनी खायचं काय याबद्दल बोलायचे सोडून लॉकडाउन करुन घरात डांबून ठेवायच्या धमक्या देतायत. तुम्हाला घरात बसायचे असल्याने तुम्ही लोकांना घाबरवताय, अशा शब्दांमध्ये देशपांडे यांनी ठाकरे सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.
धार्मिक स्थळ उघडल्याने कोरोनाची वाढ झाली असं म्हणत असाल तर ती उघडून किती काळ झाला आहे. परिणाम दिसायचा तर तेव्हाच १५ दिवसात दिसला असता. आता कसा दिसतोय हा परिणाम. कोरोनाला काय शिकवून पाठवले आहे का की अधिवेशनाच्या काळात वाढायचं आणि नंतर कमी व्हायचं?, लोकं मास्क लावूनच फिरतायत. पण तुम्ही लोकांना जबाबदार धरताय कारण तुम्हाला प्रश्नांपासून पळ काढायचा आहे, असा टोला देशपांडेंनी लगावला आहे. सावधान सध्या कोरोना चा नवीन स्ट्रेन आला आहे त्याच नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना अस आहे जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो, असं खोचक ट्विटही देशपांडे यांनी केले आहे.
आठ दिवसांमधील राज्यातील कोरोना रुग्णसंख्येची वाढ लक्षात घेऊन लॉकडाऊनसंदर्भातील निर्णय घेण्यात येईल असा इशारा रविवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. मात्र राज्यातील ठाकरे सरकार हे जनतेला लॉकडाऊनची भीती दाखवून अधिवेशनापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. देशपांडे यांनी बरोबर अधिवेशनाच्या काळामध्येच कोरोना कसा वाढला असा प्रश्न उपस्थित केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना घरात लपून बसायचे आहे.